शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Nirbhaya Case: अखेर न्याय झाला! निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना पहाटे तिहार कारागृहात फाशी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 5:32 AM

16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत एका तरुणीवर सहा जणांनी सामुहिक बलात्कार करून तिला गंभीर जखमी केले होते. त्यानंतर या तरुणीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता.

ठळक मुद्दे दिल्ली बलात्कारकांडातील चार आरोपींना आज पहाटे तिहार कारागृहात फासावर लटकवण्यात आलेविनय शर्मा, अक्षय सिंह ठाकूर, मुकेश कुमार सिंह आणि पवन गुप्ता  या चारही आरोपींना फासावर लटकवले16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत एका तरुणीवर सहा जणांनी सामुहिक बलात्कार केला होता

नवी दिल्ली - संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या दिल्ली बलात्कारकांडातील चार आरोपींना आज पहाटे तिहार कारागृहात फासावर लटकवण्यात आले. पहाटे साडेपाच वाजता जल्लादाने  खटका ओढला आणि चारही आरोपींना फासावर लटकवले आणि गेल्या सव्वासात वर्षांपासून न्यायाची वाट पाहत असलेल्या दिल्लीतीत निर्भयाला न्याय मिळाला.  गुन्हेगारांच्या वकिलांनी आपल्या अशिलांची फाशी वाचवण्यासाठी विविध कायदेशीर पर्यांय वापरून शिक्षेची अंमलबजावणी टाळण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले. मात्र त्यांचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावत सुरुवातीला दिल्ली उच्च न्यायालयाने आणि अखेरच्या क्षणी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला. अखेरीस पहाटे साडेपाच वाजता ठराविक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पवन जल्लाद यांनी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार खटका ओढला आणि विनय शर्मा, अक्षय सिंह ठाकूर, मुकेश कुमार सिंह आणि पवन गुप्ता  या चारही आरोपींना फासावर लटकवले. 

16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत एका तरुणीवर सहा जणांनी सामुहिक बलात्कार करून तिला गंभीर जखमी केले होते. त्यानंतर या तरुणीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. देशाच्या राजधानीत झालेल्या या क्रूर प्रकारामुळे संपूर्ण देश हादरला होता. तसेच सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर या प्रकरणातील सहा आरोपींविरोधात न्यायालयीन लढा सुरू झाला होता. त्यात एक आरोपी अल्पवयीन निघाल्याने त्याची सुटका झाली होती. उर्वरित आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. दरम्यान,  एका आरोपीने कारागृहातच आत्महत्या केली होती. त्यानंतर निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषी आरोपींनी विविध कायदेशीर पर्याय वापरून बरीच वर्षे आपली फाशी टाळली होती. पतियाळा हाऊस, दिल्ली उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपतींकडे दया याचिका असे सर्व पर्याय वापरूनही या गुन्हेगारांना दिलासा मिळाला नाही. त्यानंतरही विविध कायदेशीर पर्याय वापरून या गुन्हेगारांनी फाशीला हुलकावणी दिली. सर्व पर्याय संपून फाशी निश्चित झाल्यानंतर चारही गुन्हेगारांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयातही धाव घेऊन पाहिली. 

संबंधित बातम्यादोषींच्या वकिलांची अखेरची 'सर्वोच्च' चालही निष्फळ, निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना पहाटे लटकवणार फासावर 

निर्भया बलात्कार प्रकरण : चारवेळा डेथ वॉरंट निघालेला देशातील एकमेव खटला  

निर्भया अत्याचार: दोषींनी केली कोरोनाची 'ढाल'; न्यायालयात खेळली नवी चाल

Nirbhaya Case: 'आम्हाला फासावर लटकवून देशातील बलात्कार थांबणार नाहीत पण...'अखेरीस 19 मार्च रोजी सकाळपासून आरोपींच्या वकिलांनी पतियाळा हाऊस, दिल्ली उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असे सर्व कायदेशीर पर्याय वापरले. मात्र न्यायदेवतेने या सर्व गुन्हेगारांना अखेरच्या क्षणी कुठलाही दिलासा दिला नाही. 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपdelhiदिल्लीIndiaभारत