नवी दिल्ली - देशात कोरोना महामारीचं संकट असून योगगुरु बाबा रामदेव यांनी कोरोनावरील उपचारासंदर्भात विधान केलं आहे. यासंदर्भातील रामदेव बाबा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये, एलोपॅथी उपचारपद्धतीबद्दल त्यांना अविश्वासर्हता दर्शवली आहे. एलोपॅथी ही मूर्ख आणि लंगडे विज्ञान आहे. सर्वप्रथम हायड्रोक्लोरोक्वीन फेल ठरले. त्यानंतर, प्लाझा थेरपी अन् रेमडेसीवीर इंजेक्शनही फेल ठरल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलंय.
योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, IMA चा तीव्र संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 15:29 IST
कोरोनावरील उपचार पद्धतीत फॅबीफ्लू आणि स्टेरॉईडसह अन्य अँटीबॉयोटीक्सही फेल ठरल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलंय.
योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, IMA चा तीव्र संताप
ठळक मुद्देविशेष म्हणजे कोविड 19 बाधित रुग्णांचे मृत्यू हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे न होता, एलोपॅथिक औषधांमुळेच झाल्याचा दावाही बाबा रामदेव यांनी केलाय.