बापरे! लग्नमंडप बनला कुस्तीचा आखाडा, नवरदेवासह वऱ्हाडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 17:37 IST2023-06-03T17:36:37+5:302023-06-03T17:37:32+5:30
नवरदेवासह अनेक नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि जखमी वरासह वरात लग्नाशिवाय परतली.

बापरे! लग्नमंडप बनला कुस्तीचा आखाडा, नवरदेवासह वऱ्हाडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय घडलं?
बिहारच्या आरा येथे लग्नाच्याच दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. वरातीत नाचत असलेल्या व्यक्तींसोबत गैरवर्तन झाल्याने राडा झाला. पुढे हा वाद वाढला आणि थेट हाणामारी झाली. यामध्ये नवरदेवासह अनेक नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि जखमी वरासह वरात लग्नाशिवाय परतली.
मिळालेल्या माहितीनुसार, घटना धोबहा ओपीच्या मानपूर गावची आहे. जिथे गंभीर जखमी वरावर आणि मारामारीत जखमी झालेल्या अनेक वऱ्हाडीवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील धोबहा ओपी अंतर्गत मानपूर गावातील ही घटना आहे. कोयलवार पोलीस स्टेशन हद्दीतील भोपतपूर गावातील रहिवासी ललन ठाकूर यांचा मुलगा ज्योतिष ठाकूर याची वरात आली होती. मोठ्या थाटामाटात पूजा व इतर कार्यक्रम संपन्न झाला.
लग्न मंडपात आयोजित करण्यात आलेला नृत्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोक जमा झाले. त्यांनी वेगवेगळी गाणी लावण्याची मागणी केली. तसेच इतरांसोबत डान्स करायला सुरुवात केली. याच दरम्यान गैरवर्तनामुळे वाद सुरू झाला. पुढे तो वाद वाढत गेला आणि लग्नातच हाणामारी सुरू झाली. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
लग्न मंडपात झालेल्या या भांडणात नवरदेव ज्योतिष ठाकूर, त्याचे तीन नातेवाईक नीरज कुमार, अजित कुमार आणि श्री भगवान यांच्यासह वराचा मोठा भाऊ दिलीप ठाकूर आणि त्याचा मित्र बबलू कुमार गंभीर जखमी झाले. ज्यांच्यावर रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. एका हिदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.