CoronaVirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पंतप्रधानांच्या भाजपा कार्यकर्त्यांना पाच महत्त्वाच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 13:07 IST2020-04-06T13:02:32+5:302020-04-06T13:07:49+5:30

CoronaVirus भाजपाच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त मोदींचा कार्यकर्त्यांशी संवाद

Fight With Coronavirus Will Be Long says pm narendra modi On Bjp 40th foundation day kkg | CoronaVirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पंतप्रधानांच्या भाजपा कार्यकर्त्यांना पाच महत्त्वाच्या सूचना

CoronaVirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पंतप्रधानांच्या भाजपा कार्यकर्त्यांना पाच महत्त्वाच्या सूचना

नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केलं. कोरोना विषाणूशी सुरू असलेल्या युद्धात योगदान देण्याचं आवाहन त्यांनी केलं. कोरोनाविरुद्धची लढाई दीर्घकाळ सुरू राहणार आहे. त्यामुळे न थकता, न हरता प्रयत्न करत राहायचंय. आपल्याला ही लढाई जिंकायची आहे, असा निर्धार मोदींनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसमोर काही संकल्पना ठेवल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी काम करण्याचं आवाहन केलं.




कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारनं अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं आणि त्यांची अंमलबजावणी सुरू केल्याची माहिती मोदींनी कार्यकर्त्यांना दिली. कोरोनाचा परिणाम प्रत्येकावर होतो. मात्र प्रत्येकाला याची कल्पना नसते. कोरोनाशी लढण्यासाठी विमानतळावर स्क्रीनिंग, अनेक देशांतून येणाऱ्या लोकांवर निर्बंध, वैद्यकीय सुविधा मजबूत करण्याचं काम सुरू सरकारनं केल्याचं मोदी म्हणाले. 




पक्षापेक्षा देश मोठा असून तो १३० कोटी लोकांचा आहे, ही शिकवण भाजपा कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे. या संकटाच्या काळात भाजपा कार्यकर्त्यांनी काय करायला हवं याबद्दलच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या. कार्यकर्त्यांनी त्यादृष्टीनं काम करावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

- गरिबांना अन्नधान्य पुरवण्यासाठी सेवा अभियान
- एखाद्याच्या मदतीसाठी जाताना फेस मास्क जरुर वापरा. ही सवय ठेवा. स्वत:सोबतच इतरांसाठीही फेस मास्क तयार करा.
- डॉक्टर, पोलीस, नर्स, सरकारी कर्मचाऱ्यांचे आभार माना. त्यासाठी त्यांना पत्र लिहा
- आरोग्य सेतु ऍप डाऊनलोड करा आणि इतरांनादेखील करण्यास सांगा. कमीत कमी ४० जणांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतु डाऊनलोड करा.
- लाखो लोक पीएम केअर्स फंडमध्ये दान करत आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये दान करावं आणि इतर ४० जणांनाही दान करण्यास सांगावं.
- प्रत्येक कार्यकर्त्यानं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करानं आणि इतरांनादेखील करण्यास सांगावं.
 

Web Title: Fight With Coronavirus Will Be Long says pm narendra modi On Bjp 40th foundation day kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.