स्वाइन फ्लूच्या विरोधात लढा

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:15+5:302015-03-20T22:40:15+5:30

वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्या : गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा; तालुका आरोग्य अधिकार्‍यांचे आवाहन

Fight against swine flu | स्वाइन फ्लूच्या विरोधात लढा

स्वाइन फ्लूच्या विरोधात लढा

यक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्या : गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा; तालुका आरोग्य अधिकार्‍यांचे आवाहन
लोणी भापकर : बारामती तालुक्यात होणारा स्वाइन फ्लूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी तालुका आरोग्य विभागाच्या वतीने जलद गतीने सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात टॅमीफ्लूचा साठा पुरेसा असून, नागरिकांनी सर्दी, पडसे, खोकला यांसारख्या किरकोळ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. तसेच वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे आवाहन बारामती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जगताप यांनी केले आहे.
दरम्यान, तालुक्यात स्वाइन फ्लूने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. बाळासाहेब रासकर,राहुल ढमाळ, दादासाहेब निकम, कृष्णा हरिहर, कचरू दोडके यांचा यात समावेश आहे. तालुक्यात स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण सापडू लागल्यानंतर तालुका आरोग्य प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अख्त्यारित येणार्‍या गावात घरोघरी सर्वेक्षण सुरू करण्यात येत आहे. यात अंगणवाडी सेविका,आशा सेविका व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका घरोघरी जाऊन सर्दी पडसे खोकला यांसारखी लक्षणे असलेल्या व्यक्तींची पाहणी करणार आहेत. संशयित रुग्णांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात गरजेनुसार तपासण्या व औषधोपचार करण्यात येतील. सध्या तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात टॅमीफ्लूच्या गोळ्या व इतर औषधांचा पुरेसा साठा आहे. याशिवाय रुग्ण कल्याण समितीला दहा हजार रुपयांपर्यंत तातडीने औषध खरेदी करण्याचे अधिकार देण्यात आले असल्याची माहिती डॉ. जगताप यांनी दिली.
स्वाइन फ्लूू हा हवेवाटे पसरणारा विषाणुजन्य आजार आहे. त्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी अनावश्यक वावर टाळावा. सर्व शाळांनी शाळेत येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याची प्रार्थनेच्या वेळीच सर्दी पडसे खोकला यांसारख्या लक्षणांची पाहणी करावी. संशयित रुग्ण विद्यार्थ्याला तातडीने औषधोपचरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवावे. अशा विद्यार्थ्यांना घरीच विश्रांती घेऊ द्यावी. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेबाबत अधिक दक्ष राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

चौकट ...........
संशयित रुग्णांची संख्या कमी झाली
या पार्श्वभूमीवर बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यक ीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब भोई यांनी, सर्दी, ताप अशी लक्षणे असणार्‍या १२ संशयित रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती दिली. प्रतिबंधात्मक उपाय सुरू केल्यापासून संशयित रुग्णांची संख्या कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Fight against swine flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.