शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

सूत जुळलं! 50 वर्षीय शिक्षकावर 20 वर्षांच्या विद्यार्थिनीचं प्रेम जडलं; थेट मंदिरात जाऊन लग्न केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 12:11 IST

एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनीशीच लग्न केल्याची घटना घडली. 20 वर्षांची तरुणी इंग्लिश कोचिंगसाठी जायची. याठिकाणी ती इंग्लिश शिकवणाऱ्या शिक्षकाच्याच प्रेमात पडली.

कोण, कधी, कुठे, कसं, कोणाच्या प्रेमात पडेल ते सांगता येत नाही. अशीच एक अनोखी घटना आता समोर आली आहे. बिहारमध्ये प्यारवाली लव्हस्टोरी पाहायला मिळाली आहे. बिहारच्या समस्तीपूरमध्ये एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनीशीच लग्न केल्याची घटना घडली. 20 वर्षांची तरुणी इंग्लिश कोचिंगसाठी जायची. याठिकाणी ती इंग्लिश शिकवणाऱ्या शिक्षकाच्याच प्रेमात पडली. दोघांनी मंदिरात जाऊन शेवटी लग्न केलं. 

लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. यामध्ये दोघंही खूप खूश असल्याचं पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समस्तीपूरच्या रोसडा येथे राहणारी 20 वर्षांची विद्यार्थिनी श्वेता कुमारी इंग्लिश कोचिंगसाठी जायची. अभ्यास करताना ती संगीत कुमार या शिक्षकाच्या प्रेमात पडली. संगीत याला देखील श्वेता आवडू लागली. मग दोघांनी देखील लग्नाचा निर्णय घेतला. एकमेकांसोबत राहण्याची शपथ देखील घेतली आहे. 

समस्तीपूर येथील एका मंदिरात जाऊन संगीत आणि श्वेता या दोघांनी लग्न केलं. या वेळी काही जण उपस्थित होते. त्यांनीच हा व्हिडीओ काढला आणि तो आता व्हायरल झाला आहे. सध्या याच लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. 50 वर्षीय शिक्षकाच्या पत्नीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर त्याने दुसरं लग्न केलं नव्हतं. पण श्वेताच्या प्रेमात पडल्यावर आता लग्न केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

प्यारवाली लव्हस्टोरी! वडिलांच्या वयाच्या बस ड्रायव्हरच्या प्रेमात वेडी झाली 'ती'; वयात 25 वर्षांचं अंतर    

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये अशीच एक विचित्र घटना घडली आहे. एक तरुणी चक्क तिच्या वडिलांच्या वयाच्या बस ड्रायव्हरच्या प्रेमात पडल्याची घटना घडली. विशेष म्हणजे त्यांनी लग्नही केलं आहे.  मुलीने दिलेल्या माहितीनुसार, ती बसने दररोज प्रवास करत होती आणि तिला बसमधील ड्रायव्हरने वाजवलेली गाणी खूप आवडायची. हळूहळू गाण्यांसोबतच ती बस ड्रायव्हरच्याही प्रेमात पडली. बस ड्रायव्हर आणि मुलीच्या वयात मोठं अंतर होतं. पण या फरकाकडे दुर्लक्ष करून दोघांनीही लग्न केलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :marriageलग्नJara hatkeजरा हटकेTeacherशिक्षकStudentविद्यार्थी