शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

केमिकल कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 12:30 IST

बुलंदशहर रोडस्थित कवी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एफ-23 मिथाईल पिगमेंट कंपनीत ही आगीची दुर्घटना घडली. त्यानंतर, या आगीने रौद्र रुप धारण केले असून शेजारील दोन कंपन्यांनाही या आगीची झळ सोसावी लागली आहे.

ठळक मुद्दे बुलंदशहर रोडस्थित कवी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एफ-23 मिथाईल पिगमेंट कंपनीत ही आगीची दुर्घटना घडली. त्यानंतर, या आगीने रौद्र रुप धारण केले असून शेजारील दोन कंपन्यांनाही या आगीची झळ सोसावी लागली आहे.

गाझीयाबाद - उत्तर प्रदेशातील गाझीयाबाद येथील एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. बुलंदशहर रोडवरील इंडस्ट्रीयल एरियातील एका केमीकल कंपनीत ही आग लागली. त्यानंतर, शेजारील इतरही कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या आहेत. सुरुवातीला आग लागताच केमिकलचे ड्रम फुटल्याने आगीने रौद्र रुप धारण केले. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तेथे धाव घेतली असून आग आटोक्यात आणण्यात येत आहे. 

बुलंदशहर रोडस्थित कवी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एफ-23 मिथाईल पिगमेंट कंपनीत ही आगीची दुर्घटना घडली. त्यानंतर, या आगीने रौद्र रुप धारण केले असून शेजारील दोन कंपन्यांनाही या आगीची झळ सोसावी लागली आहे. आग लागलेली कंपनी केमिकल उत्पादनाशी निगडीत असल्याने आगीचे स्फोट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे, दूरपर्यंत आगीच्या धुराचे लोट पाहायला मिळाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

एनडीआरएफ टीमनेही घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले आहे. शहर मुख्याधिकारी व दंडाधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेची चौकशी सुरू आहे, मात्र आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान केमिकल कंपनीतून आग पाईपच्या आणि पुठ्ठ्याच्या कंपनीत पसरत गेल्याचे सांगण्यात येत आहे.   

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दलUttar Pradeshउत्तर प्रदेश