बेंगलोरमध्ये फटाक्याच्या दुकानाला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 09:52 PM2023-10-07T21:52:30+5:302023-10-07T21:53:25+5:30

बेंगलोरमधील अट्टीबेलेमध्ये एका फटाक्याच्या दुकानाला ही आग लागली. या दुर्घटनेत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Fierce fire at a firecracker shop in Bangalore 10 people died | बेंगलोरमध्ये फटाक्याच्या दुकानाला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू

बेंगलोरमध्ये फटाक्याच्या दुकानाला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू

googlenewsNext

कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगलोरमध्ये शनिवारी सायंकाळी फटाक्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याने एकच हाहाकार उडाला. सर्वत्र पळापळ आणि आरडा-ओरड सुरू झाली. बेंगलोरमधील अट्टीबेलेमध्ये एका फटाक्याच्या दुकानाला ही आग लागली. या दुर्घटनेत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीमुळे पेटलेल्या फटाक्यांचे आवाज दूरवर ऐकू जात होते.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका वाहनातून फटाक्यांच्या पेट्या उतरवताना बालाजी क्रॅकर्स नावाच्या दुकानाला आग लागली. यानंतर पाहता पाहता हा आग संपूर्ण दुकानात पसरली. यानंतर फायरब्रिगेटचे जवान घटनास्थळीपोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.

मात्र, रेस्क्यू टीम घनास्थळी पोहोचेपर्यंत या भीषण आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. घटनास्थळावरून आतापर्यंत 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आणखीही काही लोक आगीत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
 

Web Title: Fierce fire at a firecracker shop in Bangalore 10 people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.