तरुणावर जीवघेणा हल्ला

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:15+5:302015-02-14T23:52:15+5:30

औरंगाबाद : अनोळखी चार ते पाच जणांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सतीश पाटे (३८, रा. नागेश्वरवाडी) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना १२ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास नागेश्वरवाडी येथे घडली.

Fierce attack on youth | तरुणावर जीवघेणा हल्ला

तरुणावर जीवघेणा हल्ला

ंगाबाद : अनोळखी चार ते पाच जणांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सतीश पाटे (३८, रा. नागेश्वरवाडी) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना १२ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास नागेश्वरवाडी येथे घडली.
नागेश्वरवाडी येथील रहिवासी सतीश पाटे हे त्यांचा मित्र प्रवीण कुबेर यांच्या घरी जात होते. त्यावेळी नागेश्वरवाडी येथील मनपा शाळेसमोर चार- पाच जणांचे भांडण सुरू असल्याचे त्यांना दिसले. याप्रसंगी संभाजी भाले नावाच्या व्यक्तीने यावेळी पाटे यांच्यावरच हल्ला चढविला. यावेळी भाले यांनी त्यांच्या मांडीवर आणि कमरेखाली, हातावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या घटनेत पाटे हे जबर जखमी झाले. तसेच कुबेर यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेप्रकरणी आरोपीविरोधात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक रिठे या घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: Fierce attack on youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.