शेतातील धान जाळले

By Admin | Updated: December 19, 2014 22:56 IST2014-12-19T22:56:55+5:302014-12-19T22:56:55+5:30

The fields burned in the fields | शेतातील धान जाळले

शेतातील धान जाळले

>शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान : परिसरात संताप
नागपूर : अहोरात्र घाम गाळून पिकवलेले धान आता विकण्याची वेळ आली असताना एकाने ते जाळून टाकले. धारगाव कामठी मार्गावरील शिवारात ही संतापजनक घटना घडली. राजेश धनराज सेलूरकर (रा. शिरपूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
भरतवाडा (कळमना) येथील पुंडलिक चिंतामन घारपेंदे (वय ५०) यांची कामठी मार्गावर चार एकर शेती आहे. त्यांनी नुकतेच शेतातून धान कापले आणि ते शेतात ताडपत्रीने झाकून ठेवले. गुरुवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास संशयित आरोपी राजेशने हे धान जाळून टाकले. त्यामुळे घारपेंदे यांचे १ लाख ५० हजारांचे नुकसान झाले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी संशयित आरोपी राजेशविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.
----

Web Title: The fields burned in the fields