शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात लग्न, एकाच कंपनीत नोकरी अन् रिमोटवरुन वाद; लग्नाच्या सहा महिन्यांतच पत्नीने स्वतःला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 09:23 IST

तेलंगणामध्ये एका २५ वर्षीय तरुणीने हुंड्यांच्या छळाला कंटाळून स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे.

Telangana Crime: गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वादातून आत्महत्यांचे प्रकार समोर येत आहे. कधी हुंड्यासाठी तर कौटुंबिक छळाला कंटाळून आत्महत्या घडत आहेत. हुंड्यासाठी आजच्या काळातही महिलांचा छळ होताना पाहायला मिळत आहे. अशातच तेलंगणामध्ये सहा महिन्यांपू्र्वी लग्न झालेल्या तरुणीने हुंड्यासाठी होत असलेल्या छळाला कंटाळून स्वतःला संपवलं आहे. अवघ्या २५ वर्षीय तरुणीने इतक्या टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तरुणीच्या आईने जावयाविरोधात याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

तेलंगणाच्या हैदराबादमध्ये देविका नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने आत्महत्या केली. २५ वर्षीय देविकाने २ मार्चच्या रात्री रायदुर्गम येथील प्रशांती हिल्स येथे राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर मृत देविकाच्या आईने गुन्हा दाखल केला.  जावई सतीश लग्नापासून देविकाला हुंड्यासाठी त्रास देत होता. याला कंटाळून देविकाने आत्महत्या केली, अशी माहिती तिच्या आईने दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

देविकाचे लग्न सहा महिन्यांपूर्वी गोव्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या सतीशसोबत झाले होते. देविका आणि सतीश एकाच सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होते. दोघेही एकमेकांना २ वर्षांपासून ओळखत होते. दोघांनी ऑगस्ट २०२४ मध्ये गोव्यात लग्न केले. लग्न झाल्यापासून दोघांमध्ये तणाव होता. याच तणावातून देविकाने आत्महत्या केली. या घटनेनंतर देविकाच्या कुटुंबीयांची अवस्था रडून रडून बिकट झालीय.

जावयाने माझ्या मुलीवर घर त्याच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकला. तसेच हुंड्यासाठी छळ केला, असं देविकाच्या आईने पोलीस तक्रारीत म्हटलं. देविकाचा पती तिला हुंड्यासाठी त्रास देत असे. तिला शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला होता. ते सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केली, असं देविकाच्या कुटुंबियांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ मार्चच्या रात्री सतिश आणि देविकामध्ये टीव्हीच्या रिमोटवरून वादाला सुरुवात झाली. त्यानंतर सतिश घरातून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो परत आला तेव्हा त्याला देविका मृतावस्थेत आढळली. यानंतर देविकाने गळफास घेतल्याची माहिती त्याने पोलिसांना आणि कुटुंबीयांना दिली. दरम्यान, रायदुर्गम पोलिसांनी सतीशविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :TelanganaतेलंगणाCrime Newsगुन्हेगारीDomestic Violenceघरगुती हिंसाdowryहुंडाPoliceपोलिस