सीबीआयच्या संचालकपदी महिला अधिकारी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 05:36 IST2019-01-29T05:36:11+5:302019-01-29T05:36:22+5:30
सीबीआयच्या संचालकपदी रीना मुखर्जी यांची निवड होणार असल्याची चर्चा आहे.

सीबीआयच्या संचालकपदी महिला अधिकारी?
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : सीबीआयच्या नव्या संचालकाची नियुक्ती करण्यासाठी समितीची बैठक बुधवारी होण्याची शक्यता आहे. सीबीआयच्या संचालकपदी रीना मुखर्जी यांची निवड होणार असल्याची चर्चा आहे.
मुखर्जी मध्य प्रदेश केडरच्या असून केंद्रीय गृह मंत्रालयात विशेष सचिव आहेत. त्यांनी सीबीआयमध्ये काम केले आहे. समितीची बैठक बुधवारी न झाल्यास रीना मुखर्जी यांची संचालकपदी नियुक्ती होणे शक्य नाही. कारण त्या ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत.