शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 15:02 IST

Chhattisgarh News: छत्तीसगडमधून एक अजब घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील विलासपूर उच्च न्यायालयाने एका पतीची हरवलेली पत्नी २८ ऑगस्टपर्यंत शोधून आणण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

छत्तीसगडमधून एक अजब घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील विलासपूर उच्च न्यायालयाने एका पतीची हरवलेली पत्नी २८ ऑगस्टपर्यंत शोधून आणण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. एका तरुणाने या संदर्भात कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. त्या याचिकेतील उल्लेखानुसार, सदर तरुणाने त्याच्या प्रेयसीसोबत आर्य समाजामध्ये प्रेमविवाह केला होता. दोघेही पती पत्नीप्रमाणे राहत होते. मात्र काही दिवसांतच त्याच्या पत्नीचे नातेवाईक तिला घेऊन गेले होते. तेव्हापासून त्याची पत्नी बेपत्ता आहे. तचेस नातेवाईकही तिच्याबाबत माहिती देत नव्हते. त्यामुळे हतबल झालेल्या सदर तरुणाने कोर्टात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने हा निकाल दिला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार छत्तीसगडमधील विलासपूर आणि मुंगेरी येथील हा प्रकार आहे. विलासपूर येथील सूरज बंजारे आणि मुंगेली येथील एका तरुणीमध्ये मैत्री होती. त्यांची ही मैत्री प्रेमामध्ये बदलली. त्यानंतर या दोघांनीही रायपूर येथील आर्य समाज मंदिरात रीतीरिवाजानुसार लग्न केले. तसेच या विवाहाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनाही होती. दोघेही पती-पत्नि म्हणून राहू लागले. मात्र काही दिवसांनी सदर तरुणीचे नातेवाईक तिला भेटण्यासाठी आले आणि तिला जबरदस्तीने घेऊन गेले. तेव्हापासून तिची काहीच खबर नाही आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या पत्नीने पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे सूरजने कोर्टात धाव घेत न्यायासाठी धाव घेतली.

या तरुणाने सांगितले की, माझी पत्नी काही दिवसांनी घरी परतणार होती. मात्र बरेच दिवस ती घरी न परतल्याने मी तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. मात्र ते कुठलीही माहिती देत नव्हते.  अशा परिस्थिती मी पोलिसांकडे थाव घेतली. मात्र तिथेही निराशाच हाती लागली. तेव्हा मी उच्च न्यायालयात धाव घेत बंदी प्रत्यक्षीकरण याचिका दाखल केली. माझी पत्नी माझ्या घरी येऊ इच्छित आहे. मात्र तिचे नातेवाईक तिला येऊ देत नाही आहेत. तिचं काही बरंवाईट होईल, अशी मला भीती आहे, असे त्याने कोर्टात सांगितले. त्यानंतर कोर्टाने वरील निर्णय दिला आहे.

बिलासपूर हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी करताना हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगितले तसेच कोर्टाने या प्रकरणी तपास करून २८ ऑगस्टपर्यंत सदर तरुणीला शोधून काढण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. तसेच या तरुणीच्या वडिलांनाही कोर्टात हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडmarriageलग्नrelationshipरिलेशनशिपCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी