शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

बिहारमध्ये एनडीएत फूट? भाजपाच्या मित्रपक्षाने दिले स्वबळावर लढण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 14:47 IST

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा अद्याप झाली नसली तरी या वर्षअखेरीपर्यंत बिहारमधील निवडणुका होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देलोकजनशक्ती पक्षाने बिहारमधील सर्व २४३ जागांवर लढण्यासाठी तयार बिहारमध्ये आता कुठल्याही एका व्यक्तीचा अजेंडा चालणार नाही बिहारमध्ये आता कुठल्याही एका व्यक्तीचा अजेंडा चालणार नाही

पाटणा - एकीकडे देशातील कोरोनाच्या फैलावाचे संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत असताना दुसरीकडे बिहारमधील विधानसभा निवडणुकीची तारीखही जवळ येत आहे. या निवडणुकीच्या तारखेची घोषणा अद्याप झाली नसली तरी या वर्षअखेरीपर्यंत बिहारमधील निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निवडणुकीपूर्वी भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. बिहारमधील सत्ताधारी असलेल्या भाजपा आणि जेडीयूचा मित्रपक्ष असलेल्या लोकजनशक्ती पक्षाने बिहारमधील सर्व २४३ जागांवर लढण्यासाठी तयार असल्याचे विधान केले आहे. तसेच कोरोना संकटाचा सामना करण्याच्या नितीश कुमार यांच्या रणनीतीवरही लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.याबाबत चिराग पासवान म्हणाले की, बिहारमध्ये आता कुठल्याही एका व्यक्तीचा अजेंडा चालणार नाही. जर एनडीएमधील तीन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार असतील तर तिघांचाही अजेंचा असेल. तसेस बिहारसाठी एनडीएला किमान समान कार्यक्रम बनवावा लागेल. जर असा कार्यक्रम आता ठरला नाही तर निवडणुकीनंतरही तो ठरणार नाही. तसेच बिहारमध्ये एनडीए किंवा अशा आघाडीचे सरकारा बनेल ज्यामध्ये लोकजनशक्ती पक्ष सहभागी असेल तर ते सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारावरच बनेल.

दरम्यान, चिराग पासवान यांनी सध्याची वेळ ही बिहार विधानसभेची निवडणूक घेण्यास योग्य नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, बिहारमध्ये विधानसभा निवडणूक घेण्यासाठी ही योग्य वेळ नाही. त्यामुळे निवडणूक टाळली पाहिजे. याबाबतचा अंतिम निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा. पण सध्याची स्थिती निवडणूक घेण्यास अनुकूल नाही. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर केवळ चार ते सहा आठवड्यात निवडणुकीचा प्रचार होतो, यामध्ये सभा, मेळावे होतात. हे सर्व सोशल डिस्टंसिंग पाळून करणं कसं शक्य आहे, असा सवाल चिराग पासवासन यांनी उपस्थित केला. दरम्यान, चिराग पासवान यांनी भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांचीही भेट घेतली असून, तेव्हाही त्यांनी आपण बिहार निवडणुकीसाठी तयार नसल्याचे सांगितले होते.

टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूकBJPभाजपाLok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीJanta Dal Unitedजनता दल युनायटेड