सौदी अरेबियामध्ये उमरा यात्रेदरम्यान झालेल्या एका दुर्दैवी अपघातात किमान ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यातील बहुतेक प्रवासी हैदराबादचे असल्याचे सांगितले जात आहे. तेलंगणा सरकार आणि जेद्दाहमधील भारतीय दूतावासाने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये टँकरशी टक्कर झाल्यानंतर बसला आग लागल्याचे दिसत आहे.
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री १.३० च्या सुमारास घडला, यावेळी बहुतेक प्रवासी झोपेत होते. समोरून येणाऱ्या एका वेगाने येणाऱ्या टँकरने बसला धडक दिली. टँकरमध्ये डिझेल भरलेले असल्याचे वृत्त आहे. धडक लागताच त्याला आग लागली आणि बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. बसमधून धुराचे लोट दिसत होते. प्रवासी झोपेत असल्यामुळे त्यांना काहीच कळाले नाही.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने बचाव कार्यासाठी पोहोचल्या. जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने ८००२४४०००३ हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दु:ख व्यक्त केले
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सौदी अरेबियामधील अपघातावर दु:ख व्यक्त केले. त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक पोस्ट केली . "सौदी अरेबियातील मदिना येथे झालेल्या भारतीय नागरिकांच्या अपघाताने मला खूप धक्का बसला आहे. रियाधमधील आमचे दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावास या अपघातात बाधित झालेल्या भारतीय नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत आहेत. शोकाकुल कुटुंबियांना आमच्या मनापासून संवेदना. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो", असंही एस जयशंकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
Web Summary : A tragic bus accident in Saudi Arabia during Umrah pilgrimage reportedly killed 42 Indians, mostly from Hyderabad. The bus collided with a fuel tanker and caught fire. Indian embassy in Jeddah issued helpline numbers. External Affairs Minister S Jaishankar expressed grief.
Web Summary : सऊदी अरब में उमरा यात्रा के दौरान एक बस दुर्घटना में 42 भारतीयों की मौत की आशंका है, जिनमें से ज्यादातर हैदराबाद के हैं। बस एक ईंधन टैंकर से टकरा गई और उसमें आग लग गई। जेद्दा में भारतीय दूतावास ने हेल्पलाइन नंबर जारी किए। विदेश मंत्री एस जयशंकर ने दुख व्यक्त किया।