शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

एन्काऊंटरच्या भीतीनं गुन्हेगारांचा पोलीस ठाण्यातच मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 13:23 IST

अनेक गुन्हेगार सध्या सुरक्षेसाठी पोलीस ठाण्यात आश्रय घेत आहेत.

अनेकदा गुन्हेगार फरार होतात. पोलिसांपासून दूर राहण्याचा, शक्य तितका लांब पळण्याचा प्रयत्न करतात, असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पोलिसांच्या हाती लागलो, तर आपले काही खरे नाही, अशी भीती गुन्हेगारांमध्ये असते. मात्र उत्तर प्रदेशात सध्या याच्या नेमके उलट घडताना दिसत आहे. उत्तर प्रदेशातील अनेक गुन्हेगार सध्या सुरक्षेसाठी पोलीस ठाण्यात आश्रय घेत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, अनेक गुन्हेगार रात्रभर पोलीस ठाण्यातच मुक्काम करत आहेत. पोलीस ठाण्यात राहिलो, तरच सुरक्षित राहू, असा अनेक गुन्हेगारांचा समज आहे आणि यामागील मुख्य कारण आहे गुन्हेगारांनी घेतलेली एन्काऊंटरची धडकी.गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात एन्काऊंटर केले जात आहेत. त्यामुळे अनेक गुन्हेगारांची भीतीने गाळण उडाली आहे. पोलिसांपासून दूर पळण्याचा प्रयत्न केल्यास एन्काऊंटर होणार, अशी भीती गुन्हेगारांना सतावत आहे. त्यापेक्षा पोलीस ठाण्यात गेलेले बरे, असा विचार अनेक गुन्हेगारांनी केला आहे.  सीतापूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच मनोज कुमार नावाच्या गुन्हेगाराचा एन्काऊंटर केला. त्याच्यावर २५ हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. सरपंचाची हत्या, लूटमार आणि खंडणी प्रकरणात मनोज कुमार पोलिसांना हवा होता. मनोज कुमार प्रमाणेच जवळपास डझनभर गुन्हेगारांना सीतापूर पोलिसांनी यमसदनी धाडले आहे. याशिवाय पोलिसांनी त्यांच्या हद्दीत सक्रीय असलेल्या गुन्हेगारांची यादीदेखील केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे अनेकजण पोलिसांना स्वत:हून शरण आले आहेत. तर काहीजण एन्काऊंटरच्या भीतीने थेट पोलीस स्टेशन गाठत आहेत. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारे गुन्हेगार पोलीस ठाण्यांमध्ये दिसू लागले आहेत.  

टॅग्स :Crimeगुन्हाUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस