शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
6
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
7
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
8
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
9
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
10
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
11
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
12
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
13
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
14
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
15
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
16
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
17
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
18
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
19
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
20
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...

CoronaVirus : शहरांतील अनिर्बंध गर्दीने देशात तिसऱ्या लाटेची भीती; पंतप्रधानही चिंतित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 06:49 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मंत्र्यांच्या बैठकीत आणि शुक्रवारी ऑक्सिजन प्रकल्पांचा आढावा घेताना लोक मास्क न वापरता ज्या पद्धतीने गर्दी करीत आहेत, याविषयी चिंता व्यक्त केली.

नवी दिल्ली : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी घातलेले निर्बंध व लॉकडाऊन उठवणे सुरु करताच सर्व शहरे, बाजारपेठा आणि पर्यटन स्थळी प्रचंड गर्दी दिसू लागली आहे. लोक मास्क न घालताच सर्वत्र फिरत आहेत. त्यामुळे दुसरी लाट ओसरण्याआधीच कोरोनाची तिसरी लाट येते की काय, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मंत्र्यांच्या बैठकीत आणि शुक्रवारी ऑक्सिजन प्रकल्पांचा आढावा घेताना लोक मास्क न वापरता ज्या पद्धतीने गर्दी करीत आहेत, याविषयी चिंता व्यक्त केली. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनीही पर्यटन स्थळी कुटुंब व लहान मुलांसह होत असलेल्या गर्दीमुळे पुन्हा रुग्ण वाढण्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला. निर्बंध उठवताना खूप सावधगिरी बाळगावी, अशा सूचना सर्व राज्यांना दिला आहे. लोक जर पाळणार नसतील तर निर्बंध कायम राहतील. त्याचा मोठा आर्थिक फटका देशाला बसेल. अर्थव्यवस्था रुळावर आणताना खबरदारी घ्यावी लागेल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

लाम्बडा विषाणू भारतात नाही - देशात कोरोनाच्या लाम्बडा या विषाणूचा एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही असे केंद्राने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात आरोग्य खात्याच्या अधिकाºयांनी सांगितले की, लाम्बडा विषाणू जगातील तीस देशांमध्ये पसरला आहे. त्यात भारताचा समावेश नाही. - पेरू या देशातून लाम्बडा विषाणूचा उगम झाला. त्या देशामध्ये दर एक लाख लोकांमागे ५८७ लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. लाम्बडा विषाणूच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही नुकतेच जाहीर केले होते. कोरोनाच्या मूळ विषाणूपेक्षा लाम्बडाचा संसर्ग अधिक वेगाने पसरतो.

इतर आजारांचा धोका- रोजची कोरोना रुग्णांची संख्या अद्याप ४५ हजारांच्या घरातच आहे. ती अजूनही कमी होताना दिसत नाही. त्यातच देशभर म्युकरमायकोसिस, डेल्टा प्लस, कप्पा याचे रुग्ण आढळू लागले आहेत. - कोरोनाचेही सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र व केरळात आहेत. खबरदारी न घेतल्यास तिसऱ्या लाटेचा सामना करणे अवघड होईल. आरोग्य यंत्रणा व अर्थव्यवस्थेवर येईल, अशी भीती सरकारला वाटत आहे. - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठीऔषधे, उपकरणे, वाढीव वैद्यकीय कर्मचारी, नवे ऑक्सिजन प्रकल्प आणि असलेल्यांच्या क्षमतेत वाढ हे सारे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.  

केरळ : ‘झिका’चे १४ रुग्ण केरळमध्ये झिका विषाणूच्या संसर्गाचे १४ रुग्ण आढळले आहेत. हा विषाणू डासाच्या माध्यमातून माणसांमध्ये संक्रमित होतो. केरळमध्ये याची लागण सर्वप्रथम एका गर्भवती महिलेला झाली. त्यानंतर १३ रुग्ण तिथे सापडले. या विषाणूच्या संसर्गाची लक्षणे डेंग्यूसारखीच असतात.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNarendra Modiनरेंद्र मोदी