बाळाचा मृतदेह पिशवीत घेऊन पित्याची कलेक्टरकडे धाव, केली अशी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 06:18 IST2025-08-24T06:18:21+5:302025-08-24T06:18:38+5:30
Uttar Pradesh News: लखीमपूर खेरी येथील एका खासगी रुग्णालयात एका महिलेने प्रसूतीपूर्वीच गर्भात बाळ गमावले. मृत बाळाचा मृतदेह थैलीत घेऊन व्यथित पिता विपीन गुप्ता जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला.

बाळाचा मृतदेह पिशवीत घेऊन पित्याची कलेक्टरकडे धाव, केली अशी मागणी
लखीमपूर खेरी - येथील एका खासगी रुग्णालयात एका महिलेने प्रसूतीपूर्वीच गर्भात बाळ गमावले. मृत बाळाचा मृतदेह थैलीत घेऊन व्यथित पिता विपीन गुप्ता जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. सीडीओ अभिषेक कुमार आणि सीएमओ डॉ. संतोष गुप्ता यांनी वडिलांची व्यथा ऐकली. प्रशासन तत्काळ घटनास्थळी पोहोचले व हॉस्पिटल सील केले.
विपीनने सांगितले की, गर्भवती पत्नी रूबी (२७) हिला बिजुआ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. तेथील डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात पाठवले. तिला महेवागंज येथील गोलदार हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे नर्सने जबरदस्तीने बाहेर काढले. रूबीला दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल केले असता, चुकीच्या औषधांमुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
अधिकाऱ्यांना फुटला घाम
मुलाच्या मृत्यूनंतर, विपीन बराच वेळ भटकत राहिला. जेव्हा विपीन मुलाचा मृतदेह हातात पिशवीत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला, तेव्हा पिशवीत मृतदेह पाहून अधिकाऱ्यांनाही घाम फुटला. विपीन अधिकाऱ्यांच्या दारात रडत राहिला. दरम्यान, तो अधिकाऱ्यांना फक्त एकच गोष्ट सांगत राहिला की साहेब, कसे तरी मुलाला जिवंत करा. त्याची आई दुसऱ्या रुग्णालयात दाखल आहे.