Success Story: वडिलांचं किराणा दुकान, लेकीचं अधिकारी होण्याचं स्वप्न; जिद्दीच्या जोरावर यूपीएससी केली क्रॅक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 14:30 IST2026-03-08T14:28:12+5:302026-03-08T14:30:52+5:30

जिद्द आणि चिकाटी असेल तर आकाशही ठेंगणे वाटते, हे उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील आस्था जैन हिने सिद्ध करून दाखवले आहे.

Father grocery store, daughter dream of becoming an officer, UPSC cracked through sheer determination! | Success Story: वडिलांचं किराणा दुकान, लेकीचं अधिकारी होण्याचं स्वप्न; जिद्दीच्या जोरावर यूपीएससी केली क्रॅक!

Success Story: वडिलांचं किराणा दुकान, लेकीचं अधिकारी होण्याचं स्वप्न; जिद्दीच्या जोरावर यूपीएससी केली क्रॅक!

जिद्द आणि चिकाटी असेल तर आकाशही ठेंगणे वाटते, हे उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील आस्था जैन हिने सिद्ध करून दाखवले आहे. एका सामान्य किराणा दुकानदाराच्या लेकीने चक्क केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ९ वा क्रमांक पटकावून टॉप १० मध्ये स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, आस्थाने ही परीक्षा सलग तिसऱ्यांदा उत्तीर्ण होण्याची किमया साधली आहे.

आस्थाचे वडील अजय जैन शामलीमध्ये एक छोटेसे किराणा दुकान चालवतात. अत्यंत गरिबीत वाढलेल्या आस्थाचे लहानपणापासूनच जिल्हा दंडाधिकारी बनण्याचे स्वप्न होते. आपल्या मुलीच्या या यशाने अजय जैन आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब भारावून गेले आहे. घराबाहेर हितचिंतक आणि नातेवाईकांची अभिनंदन करण्यासाठी गर्दी केली आहे. 

आस्थाचा हा प्रवास थक्क करणारा आहे. तिने यापूर्वी दोनदा ही अत्यंत कठीण अशी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. २०२४ मध्ये ती १३१ व्या रँकसह ती आयपीएससाठी पात्र ठरली. दुसरा प्रयत्नात तिने १८६ वा क्रमांक पटकावला.  मात्र, आपले मूळ ध्येय गाठण्यासाठी ती या रँकवर समाधानी नव्हती. सध्या हैदराबाद येथे आयपीएसचे प्रशिक्षण घेत असतानाही तिने आपला अभ्यास सुरूच ठेवला. अखेर तिसऱ्या प्रयत्नात तिने थेट देशात ९ वा क्रमांक मिळवत आपले स्वप्न साकार केले.

आस्थाच्या आईने अभिमानाने सांगितले की, त्यांना चार मुले आहेत. आस्थाची एक बहीण कंपनी मॅनेजर आहे, दुसरी एमबीबीएस करत आहे, तर भाऊ दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेत आहे. मुलींच्या शिक्षणाबाबत या कुटुंबाने दाखवलेली तळमळ आज फळाला आली आहे. "आस्थाला लहानपणापासूनच अधिकारी व्हायचे होते आणि आज तिने ते करून दाखवले," अशा भावना तिच्या आईने व्यक्त केल्या. आस्थाच्या या यशामुळे केवळ तिचे कुटुंबच नाही, तर संपूर्ण शामली जिल्हा गौरवान्वित झाला आहे. सोशल मीडियावर तिच्या यशाची चर्चा असून एका किराणा दुकानदाराची लेक आता कलेक्टर होणार आहे.

Web Title : किराना व्यापारी की बेटी ने यूपीएससी परीक्षा पास कर सपना साकार किया।

Web Summary : शामली के एक किराना व्यापारी की बेटी आस्था जैन ने यूपीएससी परीक्षा में 9वां स्थान प्राप्त किया। साधारण पृष्ठभूमि से होने के बावजूद, उन्होंने लगातार तीसरी बार परीक्षा उत्तीर्ण की और आईपीएस के लिए क्वालीफाई करने के बाद जिलाधिकारी बनने का बचपन का सपना साकार किया।

Web Title : Grocer's daughter cracks UPSC, achieves dream with unwavering determination.

Web Summary : Aastha Jain, daughter of a grocer from Shamli, cracked the UPSC exam with a 9th rank. Despite humble beginnings, she cleared the exam for the third consecutive time, realizing her childhood dream of becoming a District Magistrate after already qualifying for IPS.