Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 14:25 IST2025-11-06T14:21:50+5:302025-11-06T14:25:22+5:30
एक वडील आपल्या आजारी मुलीला उचलून घेऊन ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयाकडे धावताना दिसत आहेत.

Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, जो पाहून प्रत्येक जण भावुक झालं आहे. उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील सलेमपूर येथे ही धक्कादायक घटना घडली. एक वडील आपल्या आजारी मुलीला उचलून घेऊन ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयाकडे धावताना दिसत आहेत. वडील आपल्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत.
मुलीचे कुटुंबीय मुलीला उपचारासाठी सीएचसी सलेमपूर येथे घेऊन जात होते. पण रस्त्यात प्रचंड वाहतूक कोंडी झाली, ज्यामुळे रुग्णवाहिका पुढे जाऊ शकली नाही. प्रकृती आणखी बिघडताच वडिलांनी क्षणाचाही वेळ वाया न घालवता आपल्या मुलीला उचलून घेतलं आणि रुग्णालयाकडे धावू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती, परंतु मुलीसाठी ते सर्व प्रयत्न करत होते.
उत्तर प्रदेश के देवरिया के सलेमपुर से भावुक वीडियो सामने आया, जिसमें जाम में फंसी एम्बुलेंस के बाद पिता अपनी बीमार बेटी को गोद में उठाकर अस्पताल की ओर दौड़ता दिखा. pic.twitter.com/24Fst9qHa7
— Abhishek Kumar (@pixelsabhi) November 4, 2025
सोशल मीडियावर व्हारल होणाऱ्या व्हिडिओमध्ये वडील मुलाला आपल्या छातीशी धरून वेगाने चालताना दिसत आहेत. हे दृश्य पाहून जवळच्या लोकांना धक्का बसला. अनेक जण तिथे उभे राहून हे दृश्य पाहत होते, तर रस्ता बंद होता आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीमुळे पुढे जाणं अशक्य झाल्यामुळे रुग्णवाहिका चालक असहाय्यपणे उभा होता.
ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. वडिलांची लेकासाठीची धडपड पाहून लोक भावूक झाले आहेत. कमेंटमध्ये लोक वाहतूक व्यवस्था आणि रुग्णवाहिकेच्या मार्गातील अडथळ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मुलीला वेळेवर रुग्णालयात नेण्यात आलं आणि आता तिच्या उपचार सुरू आहेत.