शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दारुच्या हव्यासापोटी पोटच्या मुलीला 300 रुपयांमध्ये नराधमांकडे सोपवलं, सहा जणांकडून सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 12:25 IST

केरळमध्ये एका अल्पवयीन तरुणीसोबत झालेल्या बलात्कार प्रकरणी विशेष पथकाने शनिवारी कारवाई करत आरोपी वडिलांना अटक केली

तिरुअनंतपुरम - केरळमध्ये एका अल्पवयीन तरुणीसोबत झालेल्या बलात्कार प्रकरणी विशेष पथकाने शनिवारी कारवाई करत आरोपी वडिलांना अटक केली. अटक केल्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान पोलिसांना काही धक्कादायक माहिती मिळाली आहे. पीडित अल्पवयीन तरुणीच्या वडिलांना दारुचं व्यसन होतं. बलात्कार प्रकरणी इतर सहा आरोपींना मदत केल्याच्या आरोपाखाली मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली. पोलिसांनी आधीच कारवाई करत सहा आरोपींना अटक केली आहे. 

प्रकरणाचा तपास करणा-या अलापुझ्झाच्या पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीच्या बापानेच आपल्या मुलीला मुख्य आरोपी मथीराकडे (24) सोपवलं होतं. मुलीला घेऊन जाण्याची परवानगी त्यानेच दिली होती. याबदल्यात त्याने काही पैसे घेतले होते, ज्यातून त्याने दारु विकत घेतली. पोलीस अधिका-याने सांगितल्यानुसार, 'अथीरा जेव्हा अल्पवयीन मुलीला घेऊन रात्री वेगवेगळ्या ठिकाणांवर गेला होता, तेव्हा त्याच्या डोक्यात काय चालू आहे याची कल्पना मुलीच्या बापाला होती'. तुमच्या माहितीसाठी, बुधवारी 17 जानेवारीला एका 15 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. दोन पोलीस कर्मचा-यांसोबत एकूण सहा जण या गुन्ह्यात सामील होते. 

पोलिसांनी सांगितल्यानुसार, फक्त 300 रुपयांच्या मोबदल्यात मुलीला भाड्याने देण्यात आलं होतं. दारु विकत घेण्यासाठी पैसे मिळावेत म्हणून हे धक्कादायक कृत्य करण्यात आलं होतं. अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणजे या गुन्ह्यात दोन पोलीस कर्मचा-यांचाही समावेश आहे. नार्कोटिक्स सेलशी संबंधित अधिकारी नेल्सन थॉमस (40) आणि मरारीकुलमचे एएसआय केजी लायजू यांच्यासहित दोन अन्य तरुण  (22 वर्षीय जिनुमन आणि 28 वर्षीय प्रिन्स)  या प्रकरणात आरोपी आहेत. प्रकरण उजेडात आल्यानंतर दोन्ही पोलीस अधिका-यांना निलंबित करण्यात आलं आहे. 

डीएसपींनी दिलेल्या माहितीनुसार, 'पीडित अल्पवयीन तरुणी आणि मुख्य आरोपी मथीराने दिलेल्या माहितीच्या आधारे इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे'. सर्व आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींविरोधात ज्युवेनाईल जस्टिस अॅक्ट आणि पॉस्को अॅक्ट अंतर्गतही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसCrimeगुन्हा