शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

प्रादेशिक पक्षांच्या आघाडीचे भवितव्य धूसर, राजकीय सौदेबाजीला सारेच तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 9:34 PM

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या राष्ट्रीय स्तरावर बिगरभाजप, बिगरकाँग्रेस आघाडी बांधण्याच्या प्रयत्नांना तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी...

वेंकटेश केसरी नवी दिल्ली : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या राष्ट्रीय स्तरावर बिगरभाजप, बिगरकाँग्रेस आघाडी बांधण्याच्या प्रयत्नांना तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी त्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी जवळीक वाढवताना दिसत आहेत. 

काँग्रेसचे राज्यसभेचे पश्चिम बंगालमधील उमेदवारअभिषेक मनु संघवी यांना ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा दिला असला तरी बंगालमध्ये तृणमूल व काँग्रेस एकत्र आल्यास तिथे भाजपाला विरोधी पक्ष म्हणून विस्ताराची संधी मिळेल, हे ममता बॅनर्जी ओळखून आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपविरोधात काँग्रेसला सरसकट पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला नाही. डाव्यांना बंगालमध्ये एकाकी पाडणे हा ममतांचा हेतू आहे. पण भाजपविरोधी मतांचे एकत्रीकरणही करायचे आहे.  

उत्तर प्रदेशमध्ये भाजपविरोधात समाजवादी पार्टी व बसपा जवळ येत असतानाच, तेलगू देशमच्या दोन केंद्रीय मंत्र्यांनी नुकताच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तेलगू देशम, शिवसेना, एलजेपी, आरएलएसपी हे मित्रपक्षही भाजपसोबत राजकीय सौदेबाजी करावी की रालोआला सोडचिठ्ठी द्यावी, यासाठी संधीची वाट पहात आहेत. 

पण काँग्रेससोबत जाण्याविषयी बिजू जनता दल, अण्णा द्रमुक, आप, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, जनता दल (सेक्युलर), तेलगू देशम पार्टी व व्हायएसआर काँग्रेस यांच्या भूमिका स्पष्ट नाहीत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, नॅशनल कॉन्फरन्स हेच काँग्रेससमवेत आहेत. द्रमुक व अजित सिंह यांच्या राष्ट्रीय लोक दलही कधी कुठे जातील, हे सांगणे अवघड आहे.  विरोधकांचे भोजनसोनिया गांधी यांनी उद्या, मंगळवारी स्नेहभोजनासाठी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण दिले आहे. त्यात टीआरएसच्या चंद्रशेखर राव यांचाही समावेश आहे. हे स्नेहभोजन आणि आणि नंतर होणारे काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन यानंतरच भविष्यातील राजकीय समीकरणे कशी असतील, हे स्पष्ट होईल. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जी