बिहारमध्ये भीषण रस्ता अपघात, लग्नाच्या मिरवणुकीची कार ट्रॅक्टरला धडकली, तीन मुलांसह ७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 08:33 IST2024-03-18T08:32:24+5:302024-03-18T08:33:22+5:30

लग्नाच्या मिरवणुकीची गाडी ट्रॅक्टरला धडकली. यामध्ये ३ मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात अनेक जण जखमीही झाले आहेत.

Fatal road accident in Bihar, wedding procession car collides with tractor, 7 dead including 3 children | बिहारमध्ये भीषण रस्ता अपघात, लग्नाच्या मिरवणुकीची कार ट्रॅक्टरला धडकली, तीन मुलांसह ७ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये भीषण रस्ता अपघात, लग्नाच्या मिरवणुकीची कार ट्रॅक्टरला धडकली, तीन मुलांसह ७ जणांचा मृत्यू

बिहारमधून मोठी बातमी समोर आली आहे. खगरिया जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन मुलांचाही समावेश आहे. लग्नातील पाहुण्यांनी भरलेल्या कार आणि ट्रॅक्टरमध्ये भीषण टक्कर झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये सात जणांना जागीच जीव गमवावा लागला. NH-31 वर हा अपघात झाला.

पुन्हा कोरोमंडल एक्स्प्रेस अपघातासारखाच थरार! साबरमती एक्स्प्रेस-मालगाडीत जोरदार टक्कर

या घटनेत अनेक जण जखमीही झाले आहेत. जखमींना  जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणि मदतकार्य सुरू आहे. बिहारमधील चौथम ब्लॉकवरून लग्नाची मिरवणूक परतत होती. पसरा पोलीस स्टेशन हद्दीतील विद्यारत्न पेट्रोल पंपाजवळ ही संपूर्ण घटना घडल्याची माहिती आहे.

Web Title: Fatal road accident in Bihar, wedding procession car collides with tractor, 7 dead including 3 children

टॅग्स :Accidentअपघात