जम्मू-काश्मीरमधील दोडामध्ये भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेले वाहन दरीत कोसळले; सात जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 11:23 IST2025-07-15T11:09:14+5:302025-07-15T11:23:13+5:30
जम्मू आणि काश्मीरमध्ये एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. येथे प्रवाशांनी भरलेला एक टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळला.

जम्मू-काश्मीरमधील दोडामध्ये भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेले वाहन दरीत कोसळले; सात जणांचा मृत्यू
मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये एक भीषण अपघात घडला. दोडा जिल्ह्यातील भारत मार्गावर एक टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळला. या अपघातात वाहनाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. टेम्पोचा क्रमांक JK064847 आहे. घटनास्थळी अनेक लोकांचे मृतदेह दिसत आहेत. रुग्णवाहिका आणि पोलिसांसह बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आहेत.
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी, मंगळवारी दोडा-बरठ रस्त्यावरील फोंडा परिसरात एक दुर्दैवी रस्ता अपघात घडला. JK06-4847 क्रमांकाचा टेम्पो ट्रॅव्हलर रस्त्यावरून घसरून खोल दरीत पडला. या अपघातात सुमारे सात जणांचा मृत्यू झाला आहे तर १० ते १५ जण जखमी झाले आहेत. मृतांचा आणि जखमींचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही. अपघाताच्या वेळी वाहनात अनेक प्रवासी होते.
स्थानिक पोलिसांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले, स्वयंसेवक आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. बळींना बाहेर काढले आणि आपत्कालीन वैद्यकीय मदत पुरवली. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर आणि बळींची ओळख पटल्यानंतर अधिक तपशील शेअर केले जातील.