"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 18:13 IST2025-11-15T18:13:32+5:302025-11-15T18:13:57+5:30
दिल्ली लाल किल्ला परिसरातील स्फोटानंतर जम्मू आणि काश्मीरमधील नौगाम पोलीस ठाण्यात झालेल्या स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांचे पथक लाल किल्ल्यावरील हल्ल्याशी संबंधित स्फोटकांचा तपास करत असताना सँपल घेत असताना हा स्फोट झाला.

"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेला स्फोट आणि जम्मू-काश्मीरमधील नौगाम पोलीस ठाणे परिसरात झालेला भीषण स्फोट, यावर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी भाष्य करत चिंता व्यक्त केली आहे. नौगाम स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. हा स्फोट लाल किल्ला परिसरातील हल्ल्याशी संबंधित स्फोटकांच्या तपासादरम्यान झाला.
दिल्ली, फरीदाबाद आणि येथील स्थिती पाहता, येणाऱ्या काळात ऑपरेशन सिंदूर सारखी परिस्थिती दिसते का? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, फारुक अब्दुल्ला म्हणाले, "आपले 18 लोक मारले गेले, सीमेवर नुकसान झाले. अल्लाह करो, दोन्ही देशांनी आपले संबंध सुधारावेत. कारण हाच एकमेव मार्ग आहे." फारूक अब्दुल्ला पुढे म्हणाले, मी वाजपेयीजींचं एक वाक्य सांगू इच्छितो, "मित्र बदलले जाऊ शकतात, पण शेजारी बदलले जाऊ शकत नाहीत." जर शेजारी मित्रत्वाने राहिले, तर दोघांचीही प्रगती होईल, पण जर शत्रुत्वाने राहिले, तर प्रगती मंदावेल."
अबदुल्ला म्हणाले, "ईडीकडे पाहण्याऐवजी आपल्या इंटेलिजन्स विंगकडे पाहा. हा खून खराबा कधीपर्यंत बघायला मिळणार?" आमचा निर्णय आसिम मुनीर घेणार का? आम्हाला राज्याचा दर्जा केव्हा मिळणार, हे ते ठरवणार का? याचे उत्तर द्यावे. आपण कुठे कमी पडत आहोत, हे आपण बघायला हवे.''
महत्वाचे म्हणजे, दिल्ली लाल किल्ला परिसरातील स्फोटानंतर जम्मू आणि काश्मीरमधील नौगाम पोलीस ठाण्यात झालेल्या स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांचे पथक लाल किल्ल्यावरील हल्ल्याशी संबंधित स्फोटकांचा तपास करत असताना सँपल घेत असताना हा स्फोट झाला.