शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

“असंच आता काश्मीरमध्ये कलम ३७० लागू केले जाईल”; कृषी कायदे रद्द केल्यावर अब्दुल्लांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 12:31 PM

फारुक अब्दुल्ला यांनी आता केंद्रातील मोदी सरकार अशाच प्रकारे जम्मू-काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० पुन्हा लागू केला जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. 

श्रीनगर: गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीनही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. यावर आता देशभरातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यातच जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत करत आता केंद्रातील मोदी सरकार अशाच प्रकारे जम्मू-काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० पुन्हा लागू केला जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. 

केंद्रातील मोदी सरकारने ज्या पद्धतीने केंद्रीय कृषी कायदे रद्द केले. त्याप्रमाणे आता जम्मू-काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० पुन्हा लागू केले पाहिजे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. संसदेत या प्रक्रियेची पूर्तता होईपर्यंत शेतकऱ्यांनी मागे हटू नये आणि आंदोलनस्थळ सोडू नये, असेही फारुक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. 

उशिरा का होईना कायदे रद्द केले

देशभरात कृषी कायद्याविरोधात मोठे आंदोलन करण्यात आले. उशिरा का होईना, पण केंद्रातील मोदी सरकारने कृषी कायदे रद्द केले, ही चांगली बाब आहे. केंद्राने आता जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे रद्द केलेले अनुच्छेद ३७० पुन्हा परत बहाल करावे, अशी आग्रही मागणीही फारुक अब्दुल्ला यांनी यावेळी केली. केंद्रातील मोदी सरकारने ५ ऑगस्ट २०१९  रोजी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द केले होते. 

दरम्यान, शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे देशात तीन कृषी कायदे आणले. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळावा, त्यांना शेतमाल विकण्यासाठी अनेक पर्याय मिळावे हा उद्देश त्यामागे होता. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचे स्वागत केले. आज त्या सर्वांचे आभार मानतो. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही तीन कायदे आणले. कदाचित आमच्या तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असेल. शेतकऱ्यांची समजूत घालण्यात कमी पडलो. त्यामुळेच तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावे, शेतात जाऊन काम सुरू करावे, एक नवी सुरुवात करावी, असे आवाहन मोदींनी केले.  

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाFarmers Protestशेतकरी आंदोलनJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370