शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

'...तर आपली परिस्थिती गाझा-पॅलेस्टाईनसारखी होईल', फारुख अब्दुलांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 14:36 IST

Jammu & Kashmir: 'जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद संपलेला नाही, हा आधीपेक्षा जास्त वाढलाय.'

Farooq Abdullah on Terrorism ( Marathi News ): जम्मू-काश्मीरमधील (Jammu & Kashmir) दहशतवाद आणि लष्कराच्या कारवाईबाबत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी मंगळवारी(दि.26) मोठे वक्तव्य केले. संवादातूनच समस्या सोडवता येऊ शकते, अन्यथा आपली गाझा आणि पॅलेस्टाईनसारखी स्थिती होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना फारुख अब्दुल्ला म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्येदहशतवाद संपलेला नाही. हा आधीपेक्षा जास्त वाढलाय. आज द्वेष इतका वाढलाय की, आपण एकमेकांचे शत्रू आहोत, असे मुस्लिम आणि हिंदूंना वाटते. नवाझ शरीफ (Nawaz Sharif) पाकिस्तानात पंतप्रधान बनणार आहेत. जर ते चर्चेला तयार असतील, तर आपण का करू नये? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.

शेजाऱ्यांशी मैत्रीत दोघांची प्रगती माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या विधानाचा संदर्भ देत फारुख अब्दुल्ला म्हणाले, मित्र बदलता येतात, शेजारी बदलता येत नाहीत. जर आपण आपल्या शेजाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंधात राहिलो तर दोघांचीही प्रगती होईल. पण, जर आपण त्यांच्याशी शत्रुत्व राखले, तर आपण लवकर प्रगती करू शकणार नाही. आजच्या युगात युद्ध हा पर्याय नाही, असे खुद्द मोदीजींनी (Narendra Modi) म्हटले आहे. चर्चेतूनच प्रश्न सुटू शकतो, असंही अब्दुल्ला म्हणाले. 

21 डिसेंबर रोजी दहशतवादी हल्ला दरम्यान, गुरुवारी (21 डिसेंबर) जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रक आणि जिप्सीवर हल्ला केला होता. लष्कराच्या दोन वाहनांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 4 जवान शहीद झाले, तर 3 जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनीही लगेच प्रत्युत्तर देत काही दहशतवाद्यांना ठार केले. महिनाभरात या भागात लष्करावर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndiaभारतTerrorismदहशतवादBJPभाजपा