शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपाला मतदान करू नका', सुसाईड नोट लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 09:01 IST

हरीद्वार जिल्ह्यातील दडकी या गावातील ईश्वरचंद्र यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.

डेहरादून - उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यात एका शेतकऱ्याने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे भाजपाला मतदान करू नका, असा संदेश या सुसाईड नोटमध्ये लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले. ईश्वरचंद्र शर्मा (65) असे या शेतकऱ्याचे नाव असून मंगळवारी पहाटेच विष पिऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. 

हरीद्वार जिल्ह्यातील दडकी या गावातील ईश्वरचंद्र यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. भाजपा सरकारने गेल्या 5 वर्षात शेतकऱ्यांना उद्धवस्त केलं आहे. त्यामुळे भाजपाला मतदान करू नका, अन्यथा ते प्रत्येकाला चहा विकायला लावतील, असे या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. पोलिसांकडून या सुसाईड नोटची खात्री करुन घेण्यात येत आहे. 

शर्मा यांना शेतीसाठी कर्ज हवे होते. त्यासाठी एका मध्यस्थी माणसाने त्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी मदत केली. मात्र, त्याबदल्यात पैसे देण्यासाठी या मध्यस्थ व्यक्तीकडून शर्मा यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात येत होती. संबंधित अधिकाऱ्याला मॅनेज करायचं असल्याने 4 लाख रुपयांच्या रकमेची मागणी दलालाने यांच्याकडे केली होती. दलालाकडून शर्मा यांना ब्लॅकमेलही करण्यात येत होते. शेतकरी शर्मा यांना 5 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्यानंतर दलालानेच हे पैसे हडप केले. दलालाने शर्मा यांच्याकडून ब्लँक चेक सही करून घेतला होता. त्यामुळे कर्जाची रक्कम शर्मा यांच्या अकाऊंटमध्ये जमा होताच, त्याने ती रक्कम काढून घेतली, असेही शर्मा यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी डेहरादून काँग्रेसने भाजपाला जबाबदार धरले असून भाजपाने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यांच म्हटलं आहे. तसेच गेल्या 2 वर्षात 17 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचंही काँग्रेसने म्हटलंय. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Farmerशेतकरी