कृषी विधेयकावरून शेतकरी रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 02:16 IST2020-09-26T02:14:59+5:302020-09-26T02:16:02+5:30
दैैनंदिन व्यवहारांवर परिणाम : असंतोष आणखी तीव्र करण्याचा काँग्रेसचा उद्देश

कृषी विधेयकावरून शेतकरी रस्त्यावर
शीलेश शर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या पाठिंब्यामुळे कृषीसंबंधी विधेयके आणि किमान आधारभूत किमतीवरून उभ्या राहिलेल्या शेतकरी आंदोलनाने पंजाब, हरयाणा, पचिम उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगडसह इतर राज्यांत दैनंदिन व्यवहारांवर विपरीत परिणाम केला.
पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी रेल्वेमार्गांवर बसून वाहतूक रोखली. कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी ‘किसान असोसिएशन’च्या झेंड्याखाली कर्नाटक, तामिळनाडू महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात असतानाही वाहतूक थांबवली. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये बागपत, बडौत, खेकडा, रमाला, टिटरीसह दुसºया पूर्ण भागात चक्का जाम केला. शेतकरी हुक्का घेऊन रस्त्यांवर जाऊन बसल्यामुळे कोणतेच वाहन तेथून जाऊ शकले नाही. राजधानी दिल्लीला लागून असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टर्स आणि ट्रॉलींची लांबचलांब रांग लागली.
आंदोलनाला बसलेल्या हजारो शेतकºयांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नोएडात शेतकºयांनी रस्ता अडवला. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कृषी विधेयकाला विरोध करीत देशात अनेक भागात शेतकºयांनी शुक्रवारी आंदोलन केले. हरयाणाच्या अंबाला येथे पंजाब- हरयाणा बॉर्डरवर आंदोलन करणारे हे शेतकरी.
च्बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वात शेतकरी रस्त्यांवर आले. पुढे पक्षाचे नेते तेजस्वी यादव ट्रॅक्टरवर बसले होते, तर त्यांच्या मागे हिरवे झेंडे घेऊन शेतकरी होते.
च्भारत बंदचा सगळ्यात जास्त परिणाम पंजाबमध्ये बघायला मिळाला. तेथे अमृतसर, फरीदकोट व हरयाणातील अंबालात शेतकरीच शेतकरी दिसत होते.