केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या दिल्ली चलो आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. हरियाणाच्या बॉर्डरवर पोलिसांनी रोखल्याने शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन करत त्यांचे बॅरिकेड्स फेकून दिले आहेत. तसेच पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे.
आंदोलकांना दिल्लीमध्ये घुसू न देण्यासाठी अंबाला-पटियाला सीमेवर पोलीस, आरएएफच्या तुकड्यांचा मोठा फौजफाटा सकाळपासून तैनात करण्यात आला होता. यामुळे या सीमेवर आंदोलकांना रोखताच मोठा गोंधळ उडाला. पोलिसांचे बॅरिकेड्स फेकून दिल्याने पोलिसांना आंदोलकांच्या गाड्या रोखण्यासाठी अंबाला-पटियाला सीमेवर मोठमोठे ट्रक आडवे लावले आहेत. यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी त्या ट्रकची तोडफोड सुरु केली आहे. तसेच ते ट्रक ढकलून बाजुले केले जात आहेत.
यामुळे पोलिस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री पहायला मिळत आहे. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली असून पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी अश्रूधुराचे गोळे फेकले आहेत.
वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!
Web Title: Farmers' protest against farm laws; Police fired tear gas, farmers pelted stone
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.