शेतकर्‍यांनो हा काळोखा रस्ता आपला नाही मसाप : ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचे प्रतिपादन

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:21+5:302015-02-14T23:52:21+5:30

भारत दाढेल ल्ल नांदेड ( गुरूवर्य नरहर कुरूंदकर नगरी )

Farmers, this is not a dark road: Presentation of Laxmikant Deshmukh, President of 36th Marathwada Sahitya Sammelan | शेतकर्‍यांनो हा काळोखा रस्ता आपला नाही मसाप : ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचे प्रतिपादन

शेतकर्‍यांनो हा काळोखा रस्ता आपला नाही मसाप : ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचे प्रतिपादन

रत दाढेल ल्ल नांदेड ( गुरूवर्य नरहर कुरूंदकर नगरी )
मराठवाडा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दु्ष्काळाशी सामना करणार्‍या शेतकरी बांधवांना हे पुन्हा मनापासून सांगूया की, तुम्ही आत्महत्या करू नका़ निराश होऊ नका़ हा काळोखा रस्ता आपला नाही़ कारण तुमच्यात अपार सामर्थ्य आहे़ तुम्ही या देशाचे पोशिंदे आहात़ आमची वाड़्मयीन संस्कृती ही तुमच्या कृषी संस्कृतीची देण आहे़ त्यामुळे आम्ही तुमचा आवाज होण्याचा सदैव प्रयत्न करत राहू, अशी ग्वाही ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिली़
मराठवाडा साहित्य परिषद व लोकपत्रच्या वतीने आयोजित केलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी येथील एमजीएम महाविद्यालयाच्या प्रांगणात गुरूवर्य नरहर कुरूंदकर नगरीत थाटात करण्यात आले़ यावेळी अध्यक्षीय भाषणात देशमुख बोलत होते़ प्रारंभी न्या़ बी़ एऩ देशमुख यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले़ यावेळी मंचावर स्वागताध्यक्ष कमलकिशोर कदम, मसाप अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, मावळते अध्यक्ष भारत सासणे, मराठी अभिनेत्री मधु कांबीकर, दादा गोरे, मसापचे जिल्हाध्यक्ष जगदिश कदम, कुंडलीक अतकरे, संमेलन कार्याध्यक्ष रवींद्र तहकीक, अंजली देशमुख, देविदास कुलकर्णी, लतिका कदम यांची उपस्थिती होती़ संमेलनाध्यक्ष देशमुख म्हणाले, मराठवाडा, विदर्भ, खानदेश दुष्काळाच्या वणव्यात होरपळून निघत आहे़ शेतातले पीक करपून गेले आहे़ प्यायला पाणी नाही़ अशा अवस्थेत इथे माणूस कसा जगवायचा हा सर्वात मोठा प्रश्न झाला आहे़ शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहेत़ तेव्हा या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दुष्काळाशी सामना करणार्‍या शेतकर्‍यांना कसे बळ देता येईल हा विचार साहित्यिकांना करावा लागेल, मराठवाड्यातील अनेक लेखक, कवी शेतकरी व ग्रामीण माणसांच्या दु:खांना शब्दरूप देत आहेत़ परंतु एक लेखक म्हणून मला कधी कधी स्वत:ची शरम वाटते़ कारण शेतकरी व ग्रामीण व एकूणच जगण्याची लढाई रोज खेळणार्‍या व पराभूत होणार्‍या या सामान्य माणसांचे दु:ख मी कमी करू शकत नाही़
१९५० च्या दशकात उर्दू कवी साहीर लुधियान्वी यांनी जब इन काली सदियों से दु:ख का बादल ढलकेगा, जब अंबर झुमके नाचेगा, जब धरती नग्मे गायेगी़़़ वो सुबह कभी तो आयेगी , असा दिलेला आशावादही आज मी देऊ शकत नाही़ कारण आपण पर्यावरण व निसर्गाशी या मधल्या काळात मस्ती केली आहे़ त्यामुळे हवामान, पाऊसकाळाचे नियमित चक्र बदलले आहे़ अशा विपरीत परिस्थितीत आम्ही लेखक, कवी शेतकरी व आम आदमीवर लिहितो म्हणजे त्यांच्या दु:खावर फुंकर घालतो की त्यांच्या वेदनेशी खेळतो ? जेव्हा जगणे कठीण होते़ तेव्हा कला माणसाला काय देते? त्याचे प्रयोजन काय, असा प्रश्नही देशमुख यांनी उपस्थित केला़
ते म्हणाले, कवी ना़ धों़ महानोर शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या संदर्भात कवितेत म्हणतात, माणसानं माणसाला पारखं व्हावं, असे बेचिराख दुष्काळ आले वारंवार, दुष्काळ नवा नाही या भारत वर्षात, कधीच कोणी गेले नाहीत त्या काळोखी रस्त्यांनी, काळोखी रस्त्याचा मार्ग कधीच आपला नाही़
उद्घाटकीय भाषणात न्या़ देशमुख म्हणाले, लेखणीत समाज उभा करण्याचे सामर्थ्य आहे़ शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्या मागे लेखणी उभी असली पाहिजे़ अनेक सत्ता आल्या परंतु शेतकर्‍यांचे प्रश्न कायम आहेत़ औद्योगिक मालाच्या किंमती त्यांचे मालक ठरवितात़ परंतु शेतीमालाची किंमत लिलावात ठरली जाते़ वातानुकुलीत कार्यालयात काम केलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांना सेवानिवृत्ती मिळते़ कारण ते राष्ट्रसेवेचे काम आहे म्हणूऩ पण जो शेतकरी उन्हा- तान्हात राबतो़ त्याचे काम राष्ट्रसेवा होऊ शकत नाही का़ शेतकर्‍यांचे प्रश्न जोपर्यंत स्वत:चे समजणार नाही, तोपर्यंत ते कायम राहतील़ प्रास्ताविक रविंद्र तहकीक यांनी केले़ सूत्रसंचालन आशा माने यांनी तर माधवी अग्रवाल यांनी आभार मानले़

Web Title: Farmers, this is not a dark road: Presentation of Laxmikant Deshmukh, President of 36th Marathwada Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.