अवकाळी पावसाने शेतकरी हतबल, सरसकट कर्जमाफीची शेतकर्यांची मागणी
By Admin | Updated: March 21, 2015 00:08 IST2015-03-20T22:40:04+5:302015-03-21T00:08:04+5:30
निकेवल : बागलाण पश्चिम प्यातील निकवेल, जोरण, विंचुरे, किकवारी, तिळवण, कंधाने, चाफ्याचापाडा, दहिंदुले, कपालेश्वर आदि गावांमध्ये वादळी वार्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले होते. या अवकाळी पावसामध्ये शेतकर्यांचे शेतातील गहू, हरभरे, कांदा, डाळींब आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानभरपाईसाठी कुठलाही शासकीय अधिकारी, कर्मचारी, पाहणी व पंचनामा करण्यासाठी न आल्याने शेतकर्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बँका, सोसायटी, पतसंस्था आदिंचे शेतकर्यांवर कर्ज असून, आता कर्ज फेडण्याची कुवत नसल्याने शासनाकडून १०० टक्के कर्जमाफी यावी, अशी मागणी शेतकर्यांकडून करण्यात येत आहे.

निकवेल परिसरात गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. पावसामुळे शेतकर्यांकडे भांडवल नसल्याकारणामुळे या भागातील दुकानदार, वाहनधारक, जेसीबी चालक-मालक, सुशिक्षित बेकार तरुणवर्ग, शासनाचे घेतलेले कर्जधारक, मजूर वर्गालाही मजुरी मिळत नसल्यामुळे सर्वेच चिंताग्रस्त असून, सर्वांवर पुन्हा कर्जाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. तसेच मार्च अखेर असल्यामुळे बँका, सोसायट्या, पतसंस्था, सावकारी कर्जधारक हे वसुलीचा तगडा लावत आहे. त्यामुळे शासनाने याची दाखल घेत सरसकट कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी माजीसैनिक शिवाजी सोनवणे, कृष्णे वाघ, शिवाजी वाघ, चिंतामण वाघ, भिका वाघ, संतोष जाधव, सोमनाथ बच्छाव, सुरेश महाजन, पंढरीनाथ महाजन, मन्साराम सोनवणे, दीपक वाघ, अभिमन महाजन, नीलेश वाघ, संजय वाघ, रमेश वाघ तसेच पंचक्रोशीतील शेतकर्यांनी केली आहे.