विदर्भ-पांढरकवडा तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:27+5:302015-02-15T22:36:27+5:30
पांढरकवडा तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

विदर्भ-पांढरकवडा तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या
प ंढरकवडा तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्यारुंझा (यवतमाळ) : मुलीचे लग्न जुळल्यानंतर पैशाची तजवीज कशी करावी या विवंचनेत एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना पांढरकवडा तालुक्यातील जोगीनकवडा येथे रविवारी घडली. रमेश जागो घोडाम (४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडे ११ एकर शेती आहे. तसेच जिल्हा बँकेचे १ लाख २० हजार रुपये कर्ज होते. मुलगी वैशाली हिचे लग्न जुळले. या लग्नासाठी पैसा कुठून आणावा, असा प्रश्न त्याच्यापुढे होता. या विवंचनेत बुधवारी त्याने आपल्या शेतात विष घेतले. हा प्रकार लक्षात येताच त्याला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.