शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : PM मोदींच्या बसवरील फोटोचं चुंबन घेत शेतकऱ्याला रडू कोसळलं, भरपूर आशीर्वाद दिले; जाणून घ्या काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 17:48 IST

संबंधित व्यक्ती कर्नाटकमधील एक शेतकरी असल्याचे बोलले जात आहे. बसवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो पाहून ही व्यक्ती अत्यंत भावूक झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

नवी दिल्‍ली - सोशल मीडियावर एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो पाहून एका व्यक्तीला आपल्या भावनां अनावर झाल्याचे दिसत आहे. बसवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवरून ही व्यक्ती सर्वप्रथम हात फिरवते. मग प्रेमाने या फोटोचे चुंबन घेते. पंतप्रधान मोदींना भरभरून आशीर्वाद देते. आपल्या पोस्ट ऑफिसच्या खात्यात 1000 रुपये आल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानते. जगाचं मनं जिंकणारे पंतप्रधान, असे मोदींचे वर्णन करते. हा व्हिडिओ कर्नाटक मधील आहे.

संबंधित व्यक्ती कर्नाटकमधील एक शेतकरी असल्याचे बोलले जात आहे. बसवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो पाहून ही व्यक्ती अत्यंत भावूक झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी ही व्यक्ती पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामाचा पाढा वाचत कौतुक करत आहे.

व्हिडिओमध्ये हा शेतकरी म्हणतो, "पंतप्रधान मोदींनी त्यांना सर्व काही दिले आहे. त्यांच्या पोस्ट ऑफिस खात्यात 1000 रुपये आले आहेत. पीएम मोदींनी त्यात आणखी 500 रुपयांची वाढ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंद आला आहे. पीएम मोदींनी वार्षाला 5 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधानांनी संपूर्ण जग जिंकले आहे. आपण त्यांना नमन करतो."

हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रती लोकांच्या मनात किती प्रेम आहे, हे दर्शवणारा हा व्हिडिओ आहे. एवढेच नाही, तर केंद्र सरकरच्या योजनांचा फायदा सर्वसामान्यांपर्यंत, अगदी शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत असल्याचे दिसून येते. महत्वाचे म्हणजे, गावाकडील लोकांना या योजनांचा फायदा फार सहजपणे मिळाला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीKarnatakकर्नाटकBJPभाजपाSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल