शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
2
मराठी सिंधी म्हणजे वडापाव- दाल पकवान एकत्र; उल्हासनगर शहर विकासासाठी निधी देणार - एकनाथ शिंदे
3
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
4
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
5
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
6
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
7
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
8
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
9
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
10
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
11
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
12
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
13
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
14
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
15
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
16
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
18
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
19
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
20
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 12:52 IST

Delhi Blast : लाल किल्ला स्फोटानंतर अल-फलाह युनिव्हर्सिटीमध्ये सुरू असलेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

लाल किल्ला स्फोटानंतर अल-फलाह युनिव्हर्सिटीमध्ये सुरू असलेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. तपास पथकाने आतापर्यंत १२ हून अधिक युनिव्हर्सिटी कर्मचारी आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली आहे, परंतु बहुतेक विधानांमध्ये गंभीर विरोधाभास आढळून आले आहेत, ज्यामुळे संशयाला आणखी वाढला आहे.

तपासात असंही समोर आलं आहे की, संशयित लोकांनी अचानक सोशल मीडिया अकाउंट (फेसबुक, इन्स्टाग्राम आणि एक्स) डीएक्टिव्हेट केलं आहे. अनेक व्यक्तींचे फोन देखील सतत बंद आहेत. यामुळे स्फोटानंतरची घटना लपविण्याचा संघटित कट रचण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे स्फोटानंतर युनिव्हर्सिटीशी संबंधित अनेक डॉक्टर आणि कर्मचारी अचानक गायब झाले आहेत.

परदेशातील हँडलरने पाठवले सुसाईड बॉम्बिंगचे ३६ व्हिडीओ; मुझम्मिल-उमरचं झालं ब्रेनवॉश

तपास पथकाने २ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असलेल्या अनेक बँक खात्यांची चौकशी सुरू केली आहे. सुरुवातीच्या तपासात काही व्यवहार संशयास्पद आढळले आहेत, ज्यामुळे मोठ्या नेटवर्कचा सहभाग असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तपास यंत्रणांचं म्हणणं आहे की विद्यापीठाशी संबंधित अनेक पैलू आता संशयाच्या भोवऱ्यात आहेत आणि येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

"आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट

जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी गनी हा फरिदाबादमधील भाड्याच्या खोलीचा वापर लॅब म्हणून करत होता. तो पिठाच्या गिरणीचा वापर करून युरिया बारीक दळत असे आणि नंतर स्फोटकांमध्ये वापरले जाणारे केमिकल तयार करण्यासाठी इलेक्ट्रिक मशीनने ते शुद्ध करत असे.

शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?

नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा

९ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी त्याच खोलीवर छापा टाकला आणि ३६० किलो अमोनियम नायट्रेटसह मोठ्या प्रमाणात स्फोटक पदार्थ जप्त केले. चौकशीदरम्यान गनीने कबूल केलं की, तो बराच काळ याच प्रक्रियेचा वापर करून युरियापासून अमोनियम नायट्रेट वेगळे करून स्फोटकं तयार करत होता. तपासात असंही उघड झालं की गनी हा फरिदाबादमधील अल-फलाह युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Al-Falah University Under Investigation: Doctors Missing, Accounts Deleted, Shocking Revelations

Web Summary : Red Fort blast investigation reveals Al-Falah University discrepancies. Staff vanished, social media deactivated. Suspicious transactions found, linking to a larger network. A doctor used a rented room as a lab, making explosives from fertilizer.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटcarकारTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्ला