जुन्नर तालुक्यात जातीनिहाय सर्वेक्षण यादी प्रसिद्ध
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:12+5:302015-03-20T22:40:12+5:30
जुन्नर : सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय सर्वेक्षण २०११ अंतर्गत प्रारूप याद्या १९ मार्च रोजी जुन्नर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती चार्ज अधिकारी सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय सर्वेक्षण २०११ तथा गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांनी दिली.

जुन्नर तालुक्यात जातीनिहाय सर्वेक्षण यादी प्रसिद्ध
ज न्नर : सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय सर्वेक्षण २०११ अंतर्गत प्रारूप याद्या १९ मार्च रोजी जुन्नर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती चार्ज अधिकारी सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय सर्वेक्षण २०११ तथा गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांनी दिली. याविषयी सविस्तर माहिती देताना सचिन घाडगे म्हणाले, की या प्रारूप याद्यांचे वाचन ग्रामसभेमध्ये होणार आहे. २८ मार्चपूर्वी ग्रामसभा घेण्याबाबत सर्व सरपंच व ग्रामसेवक यांना सूचित करण्यात आले आहे. यासंदर्भात ग्रामस्थांचे काही आक्षेप, दावे, हरकती असल्यास तसेच सर्वेक्षणाच्या वेळेस जी कुटुंबे वगळली आहेत, अशा कुटुंबांचा नव्याने समावेश करण्यासाठी १७ एप्रिलपर्यंत ग्रामपंचायत स्तरावर पंचायतस्तरीय अधिकार्यांकडे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यात ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी यांचा समावेश आहे. त्यानंतर प्राप्त आक्षेप व हरकती यावर प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून तहसीलदार प्रल्हाद हिरामणी (जुन्नर, वडगाव आनंद), गटविकास अधिकारी सचिन घाडगे (ओतूर, बेल्हे), बालविकास प्रकल्प अधिकारी रवींद्र तळपे (आपटाळे, डिंगोरे, राजूर), सहायक गटविकास अधिकारी नम्रता जगताप (नारायणगाव, निमगाव-सावा) यांची महसूल मंडलनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे. तरी कुटुंबप्रमुखांनी प्रारूप याद्यांचे अवलोकन करून स्वत:च्या कुटुंबाची माहिती पडताळून त्यावर काही आक्षेप अथवा दावा असल्यास विहित नमुन्यात अर्ज भरून अचूक माहिती सदर करावी, असे घाडगे यांनी सांगितलेमहत्वाची चौकट - ................देशात पहिल्यांदाच अशाप्रकारची जनगणना करण्यात आली आहे. या सर्वेक्षणामध्ये शासनाला राज्यातील सर्व जिल्ांतील सर्व जातीनिहाय लोकसंख्येचा अंदाज लावण्यासाठी तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची माहिती एकत्रित करण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत सामाजिक, आर्थिक जात सर्वेक्षण २०११ ची कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक घरोघर जाऊन, कुटुंबाची सामाजिक, आर्थिक स्थितीवर माहिती घेण्यात आली आहे. यातून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची यादी अद्ययावत करण्याचाही उद्देश आहे.