RJ Simran News: रेडिओ जॉकी सिमरनने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. गुरुग्राममधील सेक्टर ४७ मध्ये एका फ्लॅटमध्ये सिमरन मैत्रिणीसोबत राहत होती. तिच्या मैत्रिणीनेच याची पोलिसांना माहिती दिली. रुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला.
रेडिओ जॉकी म्हणून ती प्रसिद्ध झाली. सध्या ती सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर म्हणून काम करत होती अशी माहिती पोलिसांनी दिली. गुरूवारी दुपारी ही घटना समोर आली.
सिमरन मूळची जम्मूची असून, गुरुग्राममध्ये एका मैत्रिणीसोबत राहत होती. मैत्रिणीने तिच्या रुमचा दरवाजा बंद असल्याची माहिती दिली. पोलीस घरी गेले. बंद असलेल्या दरवाजा उघडल्यानंतर पोलिसांना सिमरनचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.
पोलिसांनी मृतदेह आधी शवविच्छेदनासाठी दिला. त्यानंतर अत्यंसंस्कारासाठी कुटुंबीयांकडे सुपूर्द केला.
सिमरन आधी रेडिओ जॉकी म्हणून काम करायची. सध्या ती फ्रिलान्सर म्हणून काम करत होती. सोशल मीडियावर तिचे ६ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. प्राथमिक तपासानंतर सिमरनने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. तरीही या प्रकरणी अधिकचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. तिच्या कुटुंबियांबरोबरच मित्रांचीही चौकशी केली जाणार आहे.