शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

मुलाचा मृत्यू झाल्यावर वडिलांनी मृतदेहासोबत पुरली बाईक; मन हेलावून टाकणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 12:47 IST

१८ वर्षीय क्रिश परमारचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबाने असं काही केलं जे पाहून सर्वजण भावुक झाले.

गुजरातमधील नाडियाद येथील उत्तरसांडा गावात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. १८ वर्षीय क्रिश परमारचा अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबाने असं काही केलं जे पाहून सर्वजण भावुक झाले. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबाने एक अनोखा आणि भावनिक निर्णय घेतला. क्रिशला त्याच्या सर्वात प्रिय वस्तूसह म्हणजेच त्याच्या बाईकसह पुरण्यात आलं. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्यांत पाणी आलं.

२६ मे रोजी संजयभाई सुलेमानभाई परमार यांचा एकुलता एक मुलगा क्रिश परमार बीसीएसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी एका कॉलेजमध्ये गेला होता. रात्री ८ वाजता परत येत असताना त्याची बाईक ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकली. टक्कर इतकी जोरदार होती की, क्रिशच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. त्याला ताबडतोब लांबवेल रोडवरील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, जिथे १२ दिवस जीवन आणि मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. याने कुटुंबाला धक्का बसला.

क्रिशला त्याची बाईक खूप आवडायची. त्याचे वडील संजयभाई म्हणाले की, "क्रिशला बाईकची खूप आवड होती. आमच्याकडे कार होती, पण तो नेहमीच बाईकने प्रवास करायचा." कुटुंबाने ठरवलं की क्रिशच्या आवडत्या गोष्टी, त्याचे कपडे, बूट, चष्मा आणि बाईक त्याच्यासोबत पुरायला पाहिजेत, जेणेकरून त्याच्या आत्म्याला शांती मिळेल. 

अंत्यसंस्कारादरम्यान, क्रिशची बाईक पुरण्यात आली जे पाहून गावकरी आणि नातेवाईकही भावूक झाले. क्रिशने नुकतीच १२वीची परीक्षा दिली होती आणि तो पुढील शिक्षणाची तयारी करत होता. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. गावात शोकाचं वातावरण आहे.  

टॅग्स :GujaratगुजरातbikeबाईकAccidentअपघात