शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळ्यामध्ये पुन्हा अग्नितांडव; बिहारचे राज्यपाल थोडक्यात बचावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 10:02 IST

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत मंगळवारी रात्री बिहारचे राज्यपाल लालजी टंडन वास्तव्यास असलेल्या कॅम्पमध्ये आग लागली. सुदैवाने लालजी टंडन बालंबाल बचावले काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नाथ संप्रदायाच्या शिबीर क्षेत्रात आग लागली होती

प्रयागराज - उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री बिहारचे राज्यपाल लालजी टंडन वास्तव्यास असलेल्या कॅम्पमध्ये आग लागली. सुदैवाने लालजी टंडन थोडक्यात बचावले. मात्र त्यांचे वास्तव्य असलेला टेंट तसेच इतर वस्तू जळून खाक झाल्या. या प्रकारानंतर राज्यपाल लालजी टंडन यांना कुंभ मेळ्यातील सर्किट हाऊसमध्ये हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी बिहारचे राज्यपाल लालजी टंडन हे प्रयागराज येथे आलेले आहेत. दरम्यान, कुंभमेळ्यात त्यांचे वास्तव असलेल्या टेंटला मध्यरात्रीनंतर  भीषण आग लागली. आगीची घटना घडली तेव्हा राज्यपाल महोदय झोपलेले होते. त्यांना सुखरूपरीत्या बाहेर काढण्यात आले. मात्र त्यांच्याजवळील मोबाइल, चष्मा, घड्याळ आदी चीज वस्तू या आगीत जळून खाक झाल्या. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये याआधीही आगीच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नाथ संप्रदायाच्या शिबीर क्षेत्रात आग लागली होती. त्यात दोन टेंट जळाले होते. त्याआधी 15 जानेवारी रोजी दिगंबर आखाड्याच्या टेंटमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली होती. त्यात 10 टेंट जळाले होते. त्याशिवाय कुंभमेळ्यामध्ये किरकोळ आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. या प्रकारांमुळे कुंभमेळ्यातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.   

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाfireआगUttar Pradeshउत्तर प्रदेश