शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, नाराजीबाबत भुजबळांशी करणार चर्चा, फडणवीस यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 10:11 IST

Nagpur: भाजप जोपर्यंत सत्तेत आहे, तोवर आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. आपण स्वत: मंत्री छगन भुजबळ यांच्याशी बोलणार आहोत. त्यांना कुठेही असे वाटत असेल की ओबीसींवर अन्याय होतो आहे, तर निर्णय सुधारणेला वाव आहे.

 नागपूर - भाजप जोपर्यंत सत्तेत आहे, तोवर आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. आपण स्वत: मंत्री छगन भुजबळ यांच्याशी बोलणार आहोत. त्यांना कुठेही असे वाटत असेल की ओबीसींवर अन्याय होतो आहे, तर निर्णय सुधारणेला वाव आहे. जेव्हा असे वाटेल की काही अडचणी आहेत, तेव्हा मी स्वत: वरिष्ठांशी बोलेन, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 

फडणवीस म्हणाले, ओबीसी समाजाचे संरक्षण करण्याचीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही आहे. जोवर भाजप सरकारमध्ये आहे, तोवर आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, ही भाजपची स्पष्ट भूमिका आहे. तसेही आताचा निर्णय हा सरसकट निर्णय नाही. ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांना प्रमाणपत्र कसे सुलभतेने मिळेल, एवढाच निर्णय आहे. माध्यमांतील आकड्यांवर किंवा विषयांवर दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरुद्ध प्रतिक्रिया देणे हे योग्य नाही. कोणत्याही समाजावर अन्याय न करण्याचीच सरकारची अतिशय स्पष्ट भूमिका आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.  

‘आमदारकीचे पण सोयरसुतक नाही’ मुंबई : मागील ३५ वर्षांपासून मी ओबीसीसाठी काम करत असून, मंत्रिपदाचे सोडा आमदारकीचेही मला सोयरसुतक नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना दिली. आमचा संघर्ष मराठा समाजाबरोबर नाही, सुरुवातीपासूनच मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, अशी भूमिका आम्ही घेतली आहे, असेही भुजबळ यावेळी म्हणाले. 

भुजबळांची समजूत काढू : अजित पवार कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण दिले जाणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. आरक्षणासंबंधी भुजबळ यांचे वेगळे मत असू शकते. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मी एकत्र बसून भुजबळ यांचे गैरसमज दूर करू. - अजित पवार, उपमुख्यमंत्री

प्रक्रिया सुरू केली टिकणारे मराठा आरक्षण देण्याच्या बाबतीत आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे आणि त्याची कार्यवाही राज्य मागासवर्ग आयोग करते आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.  

टॅग्स :reservationआरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChhagan Bhujbalछगन भुजबळ