Fact Check: दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते नाचताना दिसले का? तो व्हिडीओ मतमोजणीपूर्वीचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 15:37 IST2025-02-10T15:36:52+5:302025-02-10T15:37:05+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही काँग्रेस नेते नाचत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Fact Check: दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते नाचताना दिसले का? तो व्हिडीओ मतमोजणीपूर्वीचा...
Created By: Boom
Translated By: ऑनलाइन लोकमत
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या सर्व ७० जागांवर निकाल जाहीर झाला आहे. भाजपाला ४८ जागा मिळाल्या आहेत, तर आप २२ जागांवर आली आहे. काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. असे असले तरीही काँग्रेस नेते आपच्या या पराभवावर आनंद साजरा करत असल्याचे व्हिडीओ व्हायरल होत होते.
सोशल मीडियावर काँग्रेस नेत्यांच्या डान्सचा व्हिडीओ शेअर केला जात आहे. यावर काँग्रेसी नेते भाजपाच्या विजयाचा आणि काँग्रेसच्या पराभवाचा आनंदोत्सव साजरा करत असल्याचे युजर म्हणत आहेत. बुमने या व्हिडीओचा खरे-खोटेपणा तपासून पाहिला आहे. यामध्ये हा व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळले आहे. काँग्रेस नेत्यांचा डान्स हा २३ जानेवारी म्हणजेच निवडणुकीच्या आधीचा आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने थीम साँग लाँच केले होते. यातील ती क्लिप आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये, पवन खेरा, रागिनी नायक यांच्यासह अनेक काँग्रेस नेते ढोल आणि नगडा तसेच एका शीर्षकगीताच्या तालावर नाचताना दिसत आहेत.
एका युजरने ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आणि दावा केला की दिल्लीतील भाजपच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी काँग्रेस कार्यालयात भांगडा नृत्य सादर केले जात आहे.
पोस्टची संग्रहित लिंक.
याशिवाय, हा व्हिडिओ ABPLIVE च्या YouTube चॅनेलवर देखील त्याच दाव्यासह शेअर करण्यात आला.
तथ्य तपासणी: व्हायरल व्हिडिओ निवडणूक निकालापूर्वीचा आहे. पराभवानंतरही काँग्रेस कार्यालयात झालेल्या जल्लोषाशी संबंधित बातम्या शोधल्या तेव्हा अशा कोणत्याही बातम्या आढळल्या नाहीत. काँग्रेस कार्यालयाबाहेर शांतता असल्याचे सर्व बातम्यांत म्हटले होते. व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्सचा रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर, आम्हाला तोच व्हिडिओ २३ जानेवारी रोजी X वर पोस्ट केलेला आढळला.
२३ जानेवारी रोजी न्यूज नेशनचे पत्रकार मोहित राज दुबे यांच्या अकाउंटवर शेअर केलेला असाच एक व्हिडिओ देखील आढळला.
दिल्ली विधानसभा चुनाव को लेकर आज कांग्रेस ने थीम सॉन्ग लॉन्च किया।
इस दौरान दिल्ली कांग्रेस के नेताओं ने डांस भी किया। #DelhiElection2025#RahulGandhipic.twitter.com/sdzuMYBafT— Mohit Raj Dubey (@mohitrajdubey) January 23, 2025
यामध्ये काँग्रेसने थीम साँग लाँच केल्याचे म्हटले आहे. या लाँच दरम्यान, पवन खेरा यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी नृत्य केले.
Congress launches a theme song, '#DelhiCongressAnthem', for the upcoming Delhi Assembly elections.#ReporterDiary | @mausamii2upic.twitter.com/quR39yZf0s
— IndiaToday (@IndiaToday) January 23, 2025
याशिवाय न्यूज 24, IANS आणि इंडिया टुडे यांच्या एक्स अकाऊंटवर संबंधीत व्हिडीओ दिसत आहेत.
(सदर फॅक्ट चेक Boom या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)