Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 16:40 IST2025-10-29T16:38:15+5:302025-10-29T16:40:20+5:30
Viral Video: दिल्लीतील एका गर्ल्स हॉस्टेलच्या नावाखाली एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.

Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील एका गर्ल्स हॉस्टेलच्या गटारात कंडोम साचल्यामुळे पाईपलाईन तुंबल्याचा एक १९ सेकंदाचा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये गटार आणि नाल्यात वापरलेल्या कंडोमचे ढीग दिसत आहेत. हा व्हिडिओ दिल्लीचा असल्याचा दावा करत 'मुली शिक्षणासाठी जात आहेत की दुसरे काही करण्यासाठी?' असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, हा व्हिडीओ पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे तपासून समोर आले.
या व्हायरल व्हिडिओमध्ये एका इमारतीच्या तळमजल्यावरील ड्रेन आणि सीवर लाईन उघडलेली दिसत आहे. त्याच्या बाजूला वापरलेल्या कंडोमचे ढीग दिसत आहेत. तर, काही कंडोम नाल्यात तरंगताना दिसत आहेत. अनेक फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरकर्ते हा व्हिडिओ दिल्लीतील गर्ल्स हॉस्टेलचा असल्याचा दावा करत आहेत. एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, "दिल्लीच्या गर्ल्स हॉस्टेलमधील पाईपलाईन कंडोममुळे ब्लॉक झाली. यामुळे प्रश्न निर्माण होतो की, मुली दिल्लीला शिक्षणासाठी जात आहेत की दुसरे काही करण्यासाठी?" या दाव्यांमुळे व्हिडिओवर प्रचंड कमेंट्स आणि प्रतिक्रिया येत असून, दिल्लीतील गर्ल्स हॉस्टेलवर टीका होत आहे.
व्हायरल व्हिडिओमागील सत्य समोर
या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमागील सत्य सत्यता तपासली असता काही वेगळेच निष्कर्ष समोर आले. हा व्हिडिओ यापूर्वी आफ्रिकन चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे.'EDO ऑनलाइन टीव्ही' नावाच्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ १३ ऑक्टोबर रोजी अपलोड करण्यात आला. या व्हिडिओमध्ये पार्श्वभूमीत एक माणूस इंग्रजीत स्पष्टपणे हा नायजेरिया आहे असे बोलताना ऐकू येत आहे. परंतु, हा व्हिडिओ दिल्लीतील गर्ल्स हॉस्टेलचा असल्याचे खोटा दावा करून सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.