नवी दिल्ली - सोशल मीडियावर फेक न्यूज आणि माहिती पसरवणाऱ्यांवर फेसबूककडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असून, फेसबुकने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो अॅपशी निगडित असेल्या एका आयटी कंपनीशी संबंधित पेज आणि अकाऊंट्सवर कारवाई केली आहे. नमो अॅपशी निडडित असलेल्या सिल्व्हर टच या आयटी कंपनीशी संबंधित असलेली 15 पेज आणि अकाऊंट्स फेसबुकवरून हटवण्यात आली आहेत.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या समर्थकांचा सोशल मीडियावरील वावर वाढला असून, त्यांच्याकडून खोट्या अकाऊंट्स आणि पेजेसचा वापक करून एकमेकांविरोधात फेक न्यूज आणि चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर फेसबूककडून ही कारवाई केली जात आहे. या कारवाईदरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या नमो अॅपशी निगडित असेल्या एका आयटी कंपनीशी संबंधित पेज आणि अकाऊंट्सवर ही कारवाई करताना ही अकाऊंट्स फेसबूकवरून हटवण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींच्या नमो अॅपशी संबंधित 15 पेजेस आणि अकाऊंट्सवर फेसबुकची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 19:29 IST