शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

भविष्य सुरक्षित करण्यासाठी 5 उपाय; महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 1:09 PM

योग्य बचत केल्यामुळे तसेच आर्थिक शिस्तीचे काही नियम सुरुवातीपासून पाळल्यास महिलांना भविष्यात सुरक्षित जीवन जगता येते. त्यासाठी अगदी काटेकोर नियोजनही करावे लागते. आर्थिक कमाई करणाऱ्या महिलांनी या पाच मुद्द्यांचा विचार नक्की केला पाहिजे  

मुंबई- पुरुषांबरोबर आजच्या युगात महिला वेगाने प्रगती करत आहेत. विविध क्षेत्रामध्ये महिला कामगिरी करुन दाखवत आहेत. मात्र बहुतांशवेळा कौटुंबिक आर्थिक गरजा भागवण्यात त्यांची कमाई खर्च होते आणि बचत व गुंतवणुकीकडे दुर्लक्ष होते. महिलांनी आर्थिक कमाई झाल्यापासूनच आपल्या भविष्यासाठी तरतूद करायला सुरुवात केली पाहिजे. केवळ आर्थिक स्वातंत्र्य असणे महत्त्वाचे नाही तर सुरक्षित भविष्यही तितकेच महत्त्वाचे आहे.

योग्य बचत केल्यामुळे तसेच आर्थिक शिस्तीचे काही नियम सुरुवातीपासून पाळल्यास महिलांना भविष्यात सुरक्षित जीवन जगता येते. त्यासाठी अगदी काटेकोर नियोजनही करावे लागते. आर्थिक कमाई करणाऱ्या महिलांनी या पाच मुद्द्यांचा विचार नक्की केला पाहिजे .1) निश्चित ध्येय ठरवा- प्रत्येक महिलेने आपले अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन ध्येय ठरवले पाहिजे. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला किती पैसे लागतील, त्यासाठी किती खर्च येईल याचा विचार केला पाहिजे. अल्पकालीन ध्येयाचे उदाहरण घ्यायचे झाल्यास सुटी घेऊन फिरायला जाणे, मध्यमकालीन ध्येयाचे उदाहरण कार घेण्यासाठी पैसे साठवणे आणि दीर्घकालीन म्हणजे निवृत्तीनंतर भविष्याचा विचार अशी विभागणी करता येईल. या ध्येयांनुसार तुम्ही बचतीचे म्युच्युअल फंड, पीपीएफ, एनपीएस, पोस्टाच्या योजना आणि एफडीमध्ये विभाजन करु शकता. यासाठी आर्थिक गुंतवणूक, बचत यांचा सल्ला देणाऱ्या व्यक्तीलाही भेटू शकता. पुरेशी मुदत आणि योग्य सल्ल्याने लवकरात लवकर केलेली बचत व गुंतवणूक नक्कीच फायदेशीर ठरते.

दरमहा 500 रुपयांची बचत करुन श्रीमंत कसे व्हायचे?2) म्युच्युअल फंड एसआयपी- पैसे साठवण्यासाठी म्युच्युअल फंडाची एसआयपी हा एक चांगला पर्याय आहे. पगारातील अगदी अल्प वाटा यासाठी काढून ठेवला तरीही तुम्ही गुंतवणूक सुरु करु शकता. त्यातही इएलएसएस योजनेतून पैसे गुंतवल्यास तुम्हाला आयकर कायद्याच्या 80 सी तरतुदीनुसार सूट मिळेल. म्युच्युअल फंडात प्रतिमहा 500 रुपये गुंतवण्याची एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन योजनेतून तुम्ही पैसे गुंतवू शकता. इक्विटी फंड, डेट फंड, हायब्रिड फंड आणि गोल्ड स्कीममधून तुम्ही पैसे गुंतवू शकता. तुम्ही ज्या क्षेत्रात पैसे गुंतवले आहेत त्याच्या वाढीनुसार तुम्हाला फायदा मिळत जातो. दरमहा 500 रुपये 20 वर्षांसाठी गुंतवत गेल्यास जर सरासरी 10 टक्के वार्षिक व्याज मिळत राहिले तर मुदत संपल्यावर तुम्हाला 3.8 लाख रुपये मिळू शकतात.

नवं घर घेणार की जुनं? घर घेताना या मुद्द्यांचा जरुर विचार करा...

3) आरोग्यविमा- आरोग्यविमा हा महिलांनी अग्रक्रमाने विचार करायचा विषय आहे. कार्पोरेट हेल्थ इन्शुरन्स तुमच्याकडे असला तरी एक वेगळा आरोग्यविमा तुम्ही काढला पाहिजे. तुम्ही काम करत असलेल्या कंपनीत काढलेला विमा दीर्घकाळासाठी उपयुक्त ठरेलच असे नाही. तसेच तुम्ही नोकरी बदलता किंवा काम करणे थांबवता, करिअरमध्ये ब्रेक घेता तेव्हा इन्शुरन्सचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. रुग्णालयात भरती होण्यापूर्वी आणि भरती झाल्यानंतर काळजी घेण्यासाठी विम्याची गरज असते. आयकर कायदा 80 डी नुसार या विम्याच्या हफ्त्यामध्ये करसवलत मिळू शकते. महिलांनी या विम्याचा अगदी प्राधान्याने विचार केला पाहिजे.

तुमची कंपनी पीएफ खात्यात योग्य प्रकारे पैसे भरत नसल्यास काय कराल?4) आपत्कालीन निधी- महिलांनी सर्व बचतीबरोबर एक आपत्कालिन निधी तयार करण्यासाठी पैसे साठवले पाहिजेत. एखाद्या परिस्थितीत नोकरी सुटणे, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास दैनंदिन जीवन विस्कटू नये म्हणून या निधीची गरज आहे. सुमारे 6 ते 12 महिन्यांचा खर्च भागेल असा निधी महिलांनी तयार केला पाहिजे. तुमचा दैनंदिन खर्च, विविध बिले, कर्जाचे हफ्तेही नोकरी सुटल्यास काही काळ भरता येतील इतका निधी तयार करणे गरजेचे आहे. कोणतेही संकट आल्यास नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणींकडे पैसे मागण्याऐवजी आधी या निधीचा वापर करता येईल.5) बजेट तयार करा- पैसे किती कमवले, किती खर्च करायचे, किती गुंतवायचे याचा योग्य आराखडा मांडणारे एक बजेट तयाक करा. तुम्ही किती पैसे मिळवता, प्रत्येक महिन्यात किती पैसे खर्च करता, कोठे खर्च कमी करता येतील, पैसे कसे वाचवून गुंतवणूक करता येईल याचा अंदाज तुम्हाला घेता येईल.

सोन्यातील गुंतवणूक किती फायद्याची?... 'हे' मुद्दे लक्षात घ्या! 

टॅग्स :InvestmentगुंतवणूकWomenमहिलाBanking Sectorबँकिंग क्षेत्र