अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला

By admin | Published: December 17, 2015 01:14 AM2015-12-17T01:14:04+5:302015-12-17T01:14:04+5:30

नाताळ आणि नववर्षांदरम्यान कथितरीत्या मोठा घातपात घडवून आणण्याचा अतिरेक्यांचा डाव उधळून लावत दिल्ली पोलिसांनी बुधवारी राजधानी दिल्लीत आणि

Extremely bloody cut off! | अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला

अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला

Next

नवी दिल्ली/ भुवनेश्वर : नाताळ आणि नववर्षांदरम्यान कथितरीत्या मोठा घातपात घडवून आणण्याचा अतिरेक्यांचा डाव उधळून लावत दिल्ली पोलिसांनी बुधवारी राजधानी दिल्लीत आणि ओडिशातून अल-कायदाच्या दोन संशयित अतिरेक्यांना अटक केली. या दोन अतिरेक्यांच्या अटकेसोबतच अल-काईदाच्या भारतीय उपखंड शाखेच्या देशाबाहेर सक्रिय माड्युलचा पर्दाफाश केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद आसीफ (४१) आणि अब्दुल रहमान (३७) अशी अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांची नावे आहेत. मोहम्मद आसिफला उत्तर पूर्व दिल्लीच्या सीलमपूर भागातून अटक करण्यात आली तर अब्दुल रहमानला ओडिशातील कटक येथील जगतपूर भागातून अटक करण्यात आली. आसिफ हा अल-कायदाच्या भारतीय उपखंड शाखेच्या भरती व प्रशिक्षण विभागाचा संस्थापक सदस्य व भारतीय प्रमुख(अमीर) आहे. त्याच्याकडून तीन मोबाईल फोन, एक लॅपटॉप, शिवाय जिहादसाठी प्रोत्साहित करणारे लेख व दस्तऐवज (मौलाना उमरचे लिहिलेले) सापडले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

पाकिस्तानात घेतले प्रशिक्षण...
- दिल्लीतून अटक करण्यात आलेला मोहम्मद आसिफ जून २०१३ मध्ये दोन अन्य युवकांसोबत इराणच्या तेहरानला रवाना झाला होता. तेथे तो कासीमला भेटला. त्याच्या माध्यमातून तो इराण-पाकिस्तान सीमेनजीक गेला आणि येथून त्याने पायी सीमा पार केली.
- पाकिस्तानात पोहोचल्यानंतरह तो उत्तर वजिरिस्तानच्या सुमाली येथे पोहोचला. तेथे तो उस्मान नामक भारतीय मित्रास भेटला. उस्मान फार पूर्वी भारत सोडून तिथे स्थायिक झाला होता. उस्मान यानेच आसिफ व मौलाना आसिम उमर यांची भेट घडवून आणली. मौलाना आसिम उमर भारतीय वंशाचा अतिरेकी आहे. वजिरीस्तानात आसिफने प्रशिक्षण घेतले.
अल कायदाचा प्रमुख अयमान अल जवाहिरी यानेच त्याला अल कायदाच्या भारतीय उपखंड शाखेचा प्रमुख घोषित केले होते. वजिरीस्तानात आसिफने प्रशिक्षण घेतले.

कटक येथेही एकाला अटक
कटकच्या जगतपूर भागातून अटक करण्यात आलेला रहमान सौदी अरब, पाकिस्तान व दुबईत आंतरराष्ट्रीय संपर्कात होता. तो विवाहीत असून त्याला तीन मुले आहेत. तो एक मदरसा चालवतो. रहमानचा भाऊ ताहिर अली यास कोलकातास्थित अमेरिकन सेंटरवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

Web Title: Extremely bloody cut off!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.