शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

Love Affair News: बॉयफ्रेंडसोबत राहिली होती पत्नी; नवऱ्याने नांदण्यास नकार दिला, गावकऱ्यांनी निकाल लावला...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 1:09 PM

extra marital affair: तरुणाचे २०१७ मध्ये लग्न झाले होते. कामासाठी हा तरुण नेहमी बाहेरगावी असायचा. या काळात त्याच्या पत्नीचे शेजारच्या गावातील तरुणाशी सुत जुळले होते.

झारखंडच्या पलामूमध्ये एका विवाहितेला तिच्या पतीने नांदविण्यास नकार दिला आहे. ही महिला पती आणि तिच्या सासरच्यांच्या अनुपस्थितीत तिच्या प्रियकरासोबत राहत होती. गावकऱ्यांनी तिचा संशय आल्याने तिला रंगेहाथ पकडले होते.  यानंतर तिच्या पतीला बोलवून घेण्यात आले. पती आणि त्याचे कुटुंबीय विट भट्टीवर कामाला गेले होते, तेव्हा पत्नीने हा उद्योग केल्याने पती नाराज झाला आहे.

हे नाजूक प्रकरण तरहसी पोलीस ठाण्यातील गोइंदी गावातील आहे. महिलेचा पती विट भट्टीवर काम करण्यासाठी बाहेरगावी गेला होता. त्याच्यासोबत त्याचे आई-वडीलही होते. हे अंतर चार किमीचेच होते, परंतू दररोज जाणे येणे जमत नसल्याने पत्नीला घर सांभाळायला देऊन हे वीटभट्टी परिसरातच राहत होते. गावकऱ्यांनी त्या महिलेला प्रियकरासोबत पकडताच तिच्या पतीला बोलवून घेण्यात आले. संतापलेल्या पतीने पत्नीला सोबत ठेवण्यास नकार दिला. 

यानंतर गावकऱ्यांनी गावात एक बैठक बोलावली, यामध्ये जर पती नांदवत नसेल तर महिलेला तिच्या प्रियकराकडे पाठविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच तिची मुलगी देखील तिच्यासोबतच राहील असे ठरविण्यात आले. 

या तरुणाचे २०१७ मध्ये लग्न झाले होते. कामासाठी हा तरुण नेहमी बाहेरगावी असायचा. या काळात त्याच्या पत्नीचे शेजारच्या गावातील तरुणाशी सुत जुळले होते. पती घरी नसल्याने त्या महिलेने प्रियकराला घरी राहण्यास बोलावले होते. हे गावकऱ्यांच्या लक्षात आले. यामुळे त्यांना पकडून अखेर महिलेला तिच्या बॉयफ्रेंडकडेच कायमचे पाठविण्यात आले.

टॅग्स :relationshipरिलेशनशिप