Love Affair News: बॉयफ्रेंडसोबत राहिली होती पत्नी; नवऱ्याने नांदण्यास नकार दिला, गावकऱ्यांनी निकाल लावला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 13:10 IST2022-01-22T13:09:01+5:302022-01-22T13:10:50+5:30
extra marital affair: तरुणाचे २०१७ मध्ये लग्न झाले होते. कामासाठी हा तरुण नेहमी बाहेरगावी असायचा. या काळात त्याच्या पत्नीचे शेजारच्या गावातील तरुणाशी सुत जुळले होते.

Love Affair News: बॉयफ्रेंडसोबत राहिली होती पत्नी; नवऱ्याने नांदण्यास नकार दिला, गावकऱ्यांनी निकाल लावला...
झारखंडच्या पलामूमध्ये एका विवाहितेला तिच्या पतीने नांदविण्यास नकार दिला आहे. ही महिला पती आणि तिच्या सासरच्यांच्या अनुपस्थितीत तिच्या प्रियकरासोबत राहत होती. गावकऱ्यांनी तिचा संशय आल्याने तिला रंगेहाथ पकडले होते. यानंतर तिच्या पतीला बोलवून घेण्यात आले. पती आणि त्याचे कुटुंबीय विट भट्टीवर कामाला गेले होते, तेव्हा पत्नीने हा उद्योग केल्याने पती नाराज झाला आहे.
हे नाजूक प्रकरण तरहसी पोलीस ठाण्यातील गोइंदी गावातील आहे. महिलेचा पती विट भट्टीवर काम करण्यासाठी बाहेरगावी गेला होता. त्याच्यासोबत त्याचे आई-वडीलही होते. हे अंतर चार किमीचेच होते, परंतू दररोज जाणे येणे जमत नसल्याने पत्नीला घर सांभाळायला देऊन हे वीटभट्टी परिसरातच राहत होते. गावकऱ्यांनी त्या महिलेला प्रियकरासोबत पकडताच तिच्या पतीला बोलवून घेण्यात आले. संतापलेल्या पतीने पत्नीला सोबत ठेवण्यास नकार दिला.
यानंतर गावकऱ्यांनी गावात एक बैठक बोलावली, यामध्ये जर पती नांदवत नसेल तर महिलेला तिच्या प्रियकराकडे पाठविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच तिची मुलगी देखील तिच्यासोबतच राहील असे ठरविण्यात आले.
या तरुणाचे २०१७ मध्ये लग्न झाले होते. कामासाठी हा तरुण नेहमी बाहेरगावी असायचा. या काळात त्याच्या पत्नीचे शेजारच्या गावातील तरुणाशी सुत जुळले होते. पती घरी नसल्याने त्या महिलेने प्रियकराला घरी राहण्यास बोलावले होते. हे गावकऱ्यांच्या लक्षात आले. यामुळे त्यांना पकडून अखेर महिलेला तिच्या बॉयफ्रेंडकडेच कायमचे पाठविण्यात आले.