नवी दिल्ली : पहिल्या घरावरील कर्जाच्या व्याजावर देण्यात येणाऱ्या सबसिडीला मार्च २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ६ लाख ते १८ लाख यादरम्यान वार्षिक उत्पादन असणाºया घर खरेदीदारांना याचा लाभ मिळेल. या योजनेंतर्गत घर खरेदीदारांना केंद्र सरकारकडून २.५ लाख रुपयांचे अर्थसाह्य मिळते.केंद्रीय गृहनिर्माणमंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, मध्यम उत्पन्न गटासाठी असलेल्या क्रेडिट लिंक्ड् सबसिडी योजनेची वृद्धी व कामगिरी चांगली आहे. या वित्त वर्षाच्या अखेरपर्यंत एक लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. आतापर्यंत ९३ हजार लोकांना १,९६० कोटी रुपयांची व्याज सबसिडी मिळाली आहे. बँकांमार्फत ही सबसिडी देण्यात आली आहे.३१ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान मोदी यांनी ही सबसिडी योजना जाहीर केली होती. या योजनेला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घर खरेदीदारांसोबत अशी घरे बांधणाºया बिल्डरांनाही होणार आहे. (वृत्तसंस्था)
पहिल्या घराच्या सबसिडीला मार्च २०२० पर्यंत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 01:25 IST