शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

अल-कायदाच्या टेरर फंडिंग नेटवर्कचा पर्दाफाश; NIA चे देशभरात अनेक ठिकाणी छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 22:02 IST

NIA ने या छापेमारीत अनेक डिजिटल उपकरणे आणि बँकिंग कागदपत्र जप्त केले आहेत.

NIA Seatch Operation: राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी (11 नोव्हेंबर) दहशतवादी संघटना अल कायदाशी संबंधित संशयितांच्या विरोधात देशभरात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली. या कारवाईअंतर्गत जम्मू-काश्मीर, कर्नाटक, पश्चिम बंगाल, बिहार, त्रिपुरा आणि आसामसह नऊ ठिकाणी छापे टाकण्यात आले. एनआयएची ही कारवाई दहशतवादाबाबत देशाची सुरक्षा आणि संरक्षण धोरण मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. छापेमारीत टेरर फंडिंगशी संबंधित अनेक डिजिटल उपकरणे, बँकिंग कागदपत्रे आणि पुरावे समोर आले आहेत.

एनआयएनुसार, हे संशयित बांगलादेशस्थित अल कायदा नेटवर्कशी संबंधित आहेत. हा गट भारतात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय तरुणांना भडकवण्याचा आणि निधी देण्याचा कट रचत होता. एनआयएचा हा छापा 2023 मध्ये दाखल झालेल्या एका खटल्याशी संबंधित आहे, ज्यामध्ये संशयितांनी दहशतवादी कारवायांना निधी पुरवल्याचा आरोप आहे.

टेरर फंडिंगचा खुलासा झालाएनआयएने कारवाईदरम्यान मोबाईल फोन आणि इतर डिजिटल माध्यमांसह अनेक डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या बँकिंग दस्तऐवजांमध्ये बांग्लादेशातून दहशतवादाला निधी दिल्याचे समोर आले आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार, अल कायदाला निधी पुरवणाऱ्या अनेक बांग्लादेशी नागरिकांचे संपर्क उघड झाले आहेत, ज्यांच्यामार्फत हा निधी भारतात पोहोचवला जात होता. 

भारतीय तरुणांना भडकावण्याचे षडयंत्रएनआयएने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, संशयित अल कायदाला निधी देण्याचा आणि भारतातील तरुणांना कट्टरपंथी बनविण्याचा प्रयत्न करत होते. भारतीय तरुणांना कट्टरपंथी विचारसरणीकडे आकर्षित करून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करून घेण्याचा आरोपीचा उद्देश होता. अल कायदाशी संबंधित अनेक बांग्लादेशी नागरिक या प्रयत्नात सामील होते, जे भारतीय नागरिकांच्या सहकार्याने हे सर्व करत होते.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाTerrorismदहशतवादterroristदहशतवादी