लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 14:45 IST2025-11-15T14:41:30+5:302025-11-15T14:45:46+5:30
दिल्लीतील मेट्रो स्टेशनच्या बाहेर असलेल्या ट्रॅफिक सिग्नलजवळ उभ्या असलेल्या एका कारचा स्फोट झाला.यावेळी स्टेशनच्या आत असलेल्या वस्तू हादरू लागल्या आणि अनेक प्रवासी घाबरून मागे पळताना दिसले.

लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कारमध्ये झालेल्या स्फोटाच्या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास सुरू आहे, दरम्यान, आता या घटनेच्यावेळीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. यामुळे व्हिडीओमुळे स्फोटाची तीव्रता कळते. हे फुटेज लाल किल्ला मेट्रो स्टेशनमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीमधून मिळवण्यात आले आहे. सुरुवातीला, फुटेजमध्ये सामान्य प्रवासी दिसत आहेत. काही सेकंदांनंतर, एक जोरदार धक्का बसल्याचे दिसत आहे.
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
यावेळी मेट्रो स्टेशनच्या बाहेर असलेल्या ट्रॅफिक सिग्नलजवळ उभ्या असलेल्या एका कारचा स्फोट झाला. स्टेशनच्या आत असलेल्या वस्तू हादरू लागल्या आणि अनेक प्रवासी घाबरून मागे पळताना दिसले.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाची तीव्रता, त्याचा संरचनांवर होणारा परिणाम आणि स्फोट लाटेची दिशा समजून घेण्यात हे फुटेज महत्त्वाची भूमिका बजावत आहे." स्फोटानंतर लगेचच लाल किल्ला मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन दररोज अपडेट्स जारी करत आहे. सुरक्षा आढावा आणि तपास सुरू असल्याने पुढील सूचना मिळेपर्यंत स्टेशन बंद राहील.
सुरक्षा एजन्सी या नवीन सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करत आहेत, तसेच स्फोटस्थळ, जवळच्या रस्त्यांवर आणि स्टेशनवरील इतर अनेक कॅमेऱ्यांमधील रेकॉर्डिंगचे विश्लेषण करत आहेत. स्फोटापूर्वी आणि नंतरच्या घटनांचा संपूर्ण क्रम पुन्हा तयार करण्यासाठी या दृश्यांचा वापर केला जात आहे. अनेक सुरक्षा एजन्सी आता स्फोटाचा जलद तपास करत आहेत.
VIDEO | Delhi: CCTV visuals from inside Lal Quila Metro Station capture moments during the car blast near Red Fort that killed 13 people and injured several others on November 10.
(Source: Third Party)#RedFort#DelhiCarBlastpic.twitter.com/Pmc5S02nYn— Press Trust of India (@PTI_News) November 15, 2025